
शब्दांकन:-राजाभाऊ देशमुख
सामाजिक शैक्षणिक अध्यात्मिक वैद्यकीय राजकीय अशा कुठल्याही क्षेत्रामध्ये जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशस्वीपणे काम करून एक वेगळे स्थान निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणजे *आमदार सुहास अण्णा कांदे* यांच्या सुविद्य पत्नी *अंजुमताई सुहास अण्णा कांदे* एमबीए सारखे उच्च शिक्षण घेऊन ताईंनी आपल्या समाज सेवेला सुरुवात केली. नाशिकमध्ये समता ब्लड बँकेच्या माध्यमातून हजारो रुग्णांना रक्तदान करून एक आगळावेगळा आदर्श त्यांनी निर्माण केला. समता ब्लड बँकेच्या अध्यक्ष असलेल्या ताईंनी थे लेसेनियासारख्या रक्ताच्या दुर्धर आजाराची 99 मुलांना ताईंनी दत्तक घेतलेली आहे. खरतर जन्माला आल्यानंतर ही मुलं जास्तीत जास्त 15 ते 17 वर्षापर्यंत जगू शकता परंतु, अशा दुर्धर आजाराच्या या मुलांना ताईंनी दत्तक घेऊन त्यांचा पूर्ण खर्च व शिक्षणाचाही खर्च आज ताई करीत आहे, आणि त्यातच त्यांना खूप मनस्वी आनंद आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या आई-वडिलांना देखील काही अडी अडचण आली तरी ताई नेहमी मदतीला सदैव तत्पर असतात. भारतामध्ये कदाचित नाशिक सिव्हिल हॉस्पिटल एकमेव असेल की, ज्या हॉस्पिटलला फक्त दोनशे रुपये दरामध्ये 299 ब्याग समता ब्लड बँकेच्या माध्यमातून दिल्या जातात. आज समता ब्लड बँकेच्या चार शाखा कार्यरत असून भारतामधील पहिली अशी समता ब्लड बँक आहे की, ज्या बँकेच्या माध्यमातून जो कोणी डोनर असेल त्याला आयुष्यामध्ये कधी रक्ताची गरज भासली तर फ्री रक्त देण्याचं एक चांगला निर्णय ताईंनी घेतलेला आहे. समाजसेवेची आवड असलेल्या ताई नांदगाव मतदारसंघांमध्ये सर्व महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय झालेल्या आहे. प्रत्येक भगिनींशी आपुलकीचं नातं जिव्हाळ्याचे प्रेम संबंध जोपासल्यामुळे आज घराघरांमध्ये त्यांची ओळख निर्माण झालेली आहे मतदारसंघातील प्रत्येक गावातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एकत्र करून त्यांच्या रोजगार निर्मितीची संधी त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे. वेळप्रसंगी आर्थिक मदत देखील द्यायला ताईंनी कधी मागे पुढे पाहिलेले नाही. मतदारसंघातील महिलांचे ज्वलंत प्रश्न त्यांना बँकेमार्फत येणाऱ्या अडचणी सर्व ताईंनी बघितल्या आणि त्यांनी निश्चय केला या महिलांसाठी आपण एक स्वतंत्र अशी बँक स्थापन करावी म्हणूनच आमदार साहेबांच्या मागे लागूनत्यांनी आज समृद्धी सहकारी बँकेची स्थापना केलेली आहे. जी बँक स्थापन झाल्यानंतर 20 कोटीच्या ठेवी त्या ठिकाणी जमा झालेले आहेत.महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी ताईंनी महिलांच्या विकासाचे ध्येय उराशी बाळगुण आपल्या शिक्षण कौशल्याचा वापर करून नांदगाव विधानसभा मतदारसंघातच नव्हे तर, जिल्हाभरामध्ये एक चांगल्या प्रकारचं कार्य ताईंच्या माध्यमातून उभे राहिलेले आहे. एक आदर्शवत गृहिणी त्याचप्रमाणे आल्या गेलेल्यांचा मान सन्मान आदर करणे हे स्वतःचं कर्तव्य समजतात मराठी, हिंदी व इंग्रजी याबरोबरच संस्कृत भाषेत देखील अत्यंत चांगल्या प्रकारचे ज्ञान असलेल्या ताईंच्या माध्यमातून मतदार संघाची जिल्ह्यातील महिलांची उपेक्षितांची गोरगरीब जनतेची रुग्णांची सेवा घडो अशीच भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करतो. माझ्या बहिणीस उदंड आयुष्य उत्तम आरोग्य लाभो अशी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र….!



