
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२८५ वा दिवस
खरे प्रेम, खरी खरी भक्ती ही अहेतुक असते, तिच्यात कामनेची भेसळ नसते; ती नित्य नवीन असते, ती प्रतिक्षण वाढत जाते, ती सूक्ष्म अनुभूती आहे. सूक्ष्म अनुभव हेच तिचे स्वरूप आहे. ती अनुभवाद्वाराच समजणे शक्य आहे, तिचे वर्णन करून ती समजावून देणे शक्य नाही. भक्तीच सगळ्यात सोपा उपाय आहे, अत्यंत सुलभ साधन आहे. भक्ती ही अत्यंत स्वाभाविक गोष्ट आहे. ती कसल्याही तर्कावर वा अनुमानांवर अवलंबून नाही. भक्ती स्वतःप्रमाण आहे, तिचा खरेपणा सिद्ध करण्यासाठी अन्य कोणत्याही प्रमाणांची वा पुराव्याची काहीच गरज नाही. तर्क म्हणजे खरोखर काय? तर्क म्हणजे एखाद्या गोष्टीला आपल्या मनाच्या द्वारा सीमाबद्ध वा मर्यादित करणे. मनरुपी जाळे फेकून जशी एखादी वस्तू आपण पकडतो. तसे ईश्वराला आपण याप्रमाणे जाळ्यात कधीच पकडू शकणार नाही. भक्ती ही अहेतुक असली पाहिजे भगवंताखेरीज भक्तीचा आणखी कशाशीही संबंध नसावा. *स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर जेष्ठ /शुक्रमास ८ शके १९४८
★ जेष्ठ अधिक शुध्द /शुक्ल १३
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ शुक्रवार दि. २९ मे २०२६
★ १९१७ अमेरिकेचे लोकप्रिय राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे मित्र जॉन एफ. केनेडी यांचा जन्मदिन.
★ १९७२ दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त हिंदी चित्रपट अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचा स्मृतीदिन.
★ १९८७ लोकदल पक्षाचे संस्थापक भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचा स्मृतीदिन.
★ २०१० समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक ग. प्र. प्रधान यांचा स्मृतीदिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
