
:मालेगाव ( प्रतिनिधी ) मालेगांव येथे धक्कादायक घटना घडलीय आपल्या पोटच्या लेकीला दुथडी वाहणाऱ्या गिरणा नदीच्या पाण्यात फेकून स्वतः ही उडी मारली … टेहरे फाटा गिरणा नदी पुलावर हृदयद्रावक घटना! घडली आहे.कौटुंबिक वादातून पित्याने आपल्या चार वर्षांच्या मुलीला उसळत्या नदीत फेकलं आणि स्वतःही उडी घेतली.

यांनी वाचवले मुलीचे व बापाचे प्राण
क्षणभरात दोघांचे जीव धोक्यात, मात्र स्थानिक युवक देवदूत ठरले. जीवाची पर्वा न करता उडी मारून वडील आणि मुलीला वाचवलं.मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.या प्रसंगाने मालेगावात हळहळ व्यक्त होत आहे.
