
सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या वतीने दि.२२/०८/२०२५ रोजी मुक्काम पोस्ट ओढा तालुका जिल्हा नाशिक या ठिकाणी कृषी ऋण मेळा सेंट्रल बँकेचे माननीय श्री विवेक कुमार महाप्रबंधक केंद्रीय कार्यालय मुंबई यांच्या मार्गदर्शना खाली कृषी ऋण मेळा घेण्यात आला या मेळाव्यात शेतकरी, व्यावसायिक, यांना कर्ज सवलतीच्या दरात मिळून देणे तसेच कोणकोणत्या प्रकारचे कर्ज शेतकऱ्यांना कमी व्याजदरात मिळतील तसेच बँक आणि खातेदार यांचा समन्वय साधण्याकरता आजचा कृषी ऋण मेळा घेण्यात आला.

या मेळाव्यात काही कर्जदारांना सेंट्रल बँकेच्या वतीने कर्जाच्या चेकचे वितरण सर्वांच्या साक्षीने करण्यात आले कर्जाची परतफेड बँकेच्या नियमानुसार केल्यानंतर कर्जदाराला सबसिडी देण्यात येईल ओढा गावचे पोलीस पाटील गजानन भोर तंटामुक्तीचे अध्यक्ष बबनराव कंक माजी सरपंच साहेबराव पेखळे, विष्णू दादा पेखळे तसेच शिलापूरचे सरपंच पवन कहाडळ ओढा ग्रामपंचायत सदस्य व सेंट्रल बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच ओढा गावातील ग्रामस्थ या मेळाव्या करता उत्साहाने हजर होते ओढा गावचे पोलीस पाटील आदरणीय गजानन भोर यांनी बँक अधिकारी आणि कर्मचारी यांचे ओढागावात कृषी मेळावा घेतल्याबद्दल धन्यवाद व आभार मानले
