
..सिन्नर –(प्रतिनिधी ) के. के. वाघ महाविद्यालयात ‘गुरु-शिष्य स्मृती प्रित्यर्थ’ आयोजित जिल्हास्तरीय समूह नृत्य स्पर्धेत मातोश्री चांडक कन्या विद्यालयाच्या लहान गटातील (५वी ते ७वी) विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले.प्रभावी व आकर्षक सादरीकरणाच्या बळावर विद्यार्थिनींनी परीक्षकांची मने जिंकली. या विजेत्या विद्यार्थिनींना ₹१,०००/- रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.या यशामध्ये श्रीमती सुप्रिया गायकवाड यांनी नृत्य मार्गदर्शक म्हणून विशेष परिश्रम घेतले. यशस्वी विद्यार्थिनींच्या सन्मानार्थ विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष श्रीराम क्षत्रिय, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष श्री गोरक्ष सोनवणे, मुख्याध्यापिका सुनिता कर्डिले, पर्यवेक्षिका सुवर्णा सोनवणे, स्टाफ सेक्रेटरी उत्तम भोये तसेच पालक शिक्षक संघाचे सचिव राजहंस माळी, सहसचिव जयश्री सोनवणे, खजिनदार दिपक गायकवाड, सहखजिनदार कोमल लहाने आदी पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थिनींच्या परिश्रमाचे कौतुक केले.विद्यालयातील सर्व शिक्षक आणि पालक शिक्षक संघाचे सदस्य —राजेंद्र पाबळे, सुनील कुऱ्हे, पोपट इलग, सचिन गोळेसर, गुलाब कांदे, गायत्री कर्नाटकी, सविता ठोक, स्मिता क्षत्रिय, सुरेखा पाटील, कावेरी गुंजाळ, मंजुषा आहेर, माया सोनवणे, रेखा वाघ, रेश्मा जहागीरदार, रोहिणी करंजकर आदींनी विद्यार्थिनींना प्रोत्साहन दिले.तसेच शिक्षकवर्गातील अलका वाघ, उमा लोकरे, वैशाली दातीर, मंगेश जाधव, तृषाली बोडके, कुसुम सोनवणे, संयुक्ता कुलकर्णी, सुवर्णा बांबळे, प्रतिभा वाढवणे, नीलिमा दुसाने, रवींद्र आसवले, रेश्मा कडतंन, संध्या कुलकर्णी, प्रिया कुलकर्णी, मनीषा उकाडे, सुरेखा जेजुरकर, माधुरी कुलकर्णी, सोनाली मोरे,कांतीलाल कासार, पूजा गुरळे, ज्योती डोंगरे, संगीता पवार, कल्पना पारखे, हरिओम भडांगे, गंगाराम उघडे, अनिता मुळे, अरुणा जमधाडे, भगवंत भोये आदींनी विद्यार्थिनींची नृत्यकला खुलविण्यासाठी मोलाचे योगदान दिले.सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि शिक्षकवर्गाने विद्यार्थिनींच्या मेहनतीचे कौतुक करत विद्यालयाची सांस्कृतिक कार्यक्षमता अधोरेखित केली.
