
नांदगाव ( प्रतिनिधी)*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरखेड येथील शिक्षक मनोज बन्सी डोंगरे यांना ए. डी. फाऊंडेशनचा सांगली चा अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त साहित्यरत्न जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.नांदगाव तालुक्यात शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारे श्री मनोज डोंगरे यांचे उपक्रमशील शिक्षण, ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण शिक्षण, सामाजिक जाणीव जागृती, शिक्षण माध्यमातून सुरू असलेले सामाजिक व शैक्षणिक कार्य नेहमीच इतरांना प्रेरणादायी ठरत आहे

. त्यांच्या कार्याची दखल घेत अनेक सामाजिक संस्थांकडून त्यांना राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनी ए. डी. फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक गोरड यांनी श्री. डोंगरे यांना साहित्यरत्न जीवन गौरव पुरस्काराची घोषणा केली. २३ ऑगस्ट रोजी पुरस्काराचे वितरण होणार असून यावेळी सांगलीचे खासदार विशाल पाटील, महापौर डॉ. नितीन सावगावे, आमदार इद्रीस नायकवडी, माजी आमदार विक्रम सावंत, सुजय शिंदे उपस्थित. राहणार आहे.

