
मखमलाबाद विद्यालयात शालेय बूट व वह्यांचे वाटप करताना प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य रावसाहेब उशीर, पर्यवेक्षक संजय हांडगे व ज्येष्ठ शिक्षकवृंद
मखमलाबाद ( वार्ताहर ) = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे ग्रेप ॲम्बेसीचे संचालक व मखमलाबादचे युवा उद्योजक किरण नामदेव पिंगळे यांच्यातर्फे विद्यालयातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय बुटांचे व वह्यांचे वाटप करण्यात आले

यामध्ये ५४ मुले व ५० मुली अशा एकूण १०४ विद्यार्थ्यांना बुटांचे व वह्यांचे अशा एकूण ३०,०००/- रुपयांच्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण ज्येष्ठ शिक्षिका भाग्यशाली जाधव यांनी व आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण जेष्ठ शिक्षक दयाराम मुठाळ यांनी केले.प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य रावसाहेब उशीर,पर्यवेक्षक संजय हांडगे यांच्या शुभहस्ते बुटांचे व वह्यांचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी जेष्ठ शिक्षक अनिल पगार,सविता आहेर,भाग्यशाली जाधव,सुनिता उशीर,प्रमोद पगार,शरद आहेर, सोमेश्वर मुळाणे तसेच सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
