
सिन्नर येथे शहीद डॉ.दाभोळकर यांना स्मृतिदिनानिमित्त श्रद्धांजली अर्पण करताना अंनिसचे पदाधिकारीसिन्नर (प्रतिनिधी) शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना स्मृतिदिनानिमित्त सिन्नर येथील हुतात्मा चौकात सिन्नर तालुका अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने अभिवादन करण्यात येऊन श्रध्दांजली वाहण्यात आली. डॉ.नरेंद्र दाभोळकर यांनी आपले संपूर्ण जीवन समाजातील अंधश्रध्दा दूर करण्यासाठी तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी समर्पित केले. त्यांनी विवेकी,सदाचारी व नैतिक मूल्यांचे जतन करणारा समाज हवा यासाठी प्रयत्न केले,अशा भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केल्या. त्यांचा स्मृतिदिन वैज्ञानिक दृष्टीकोन दिन म्हणूनही साजरा केला जातो.यावेळी नाशिक जिल्हा अंनिसचे उपाध्यक्ष डॉ.श्यामसुंदर झळके,तालुकाध्यक्ष हरिभाऊ तांबे, महामित्र दत्ता वायचळे, प्रधान सचिव राजेंद्र मीठे,प्रमोद काकडे,बापू चतुर,प्रभाकर चतुर, बस्तीराम कूंदे आदी उपस्थित होते.
