
नाशिक ( प्रतिनिधी ) ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर अण्णा हजारे यांच्या उपस्थिती राष्ट्रीय लोक आंदोलन न्यास. नाशिक जिल्ह्याची राळेगण सिद्धी येथे बैठक संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये संघटने मार्फत संघर्ष करून केंद्र व राज्य शासनाला मानके अधिकार अधिनियम 2005 कायद्याचे तसेच दप्तर दिरंगाई कायदा व महाराष्ट्र नागरिक सेवा हमी व बदली कायदा तसेच लोकायुक्त कायदा असे एकूण दहा लोकाभिमुख जे कायदे करण्यात आले त्या कायद्याची जनजागृती करून सोबतच जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी स्थानिक नागरिकांना संघटित करून लोक आंदोलन उभे करा व आंदोलनाकरिता मोलाचे मार्गदर्शन ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर अण्णा हजारे साहेबांनी सूचना करीत खूप मार्गदर्शन केले.

नाशिक जिल्हा सोबत नांदगाव तालुका बांधणीसाठी सूचना देखील केल्या. ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर अण्णा हजारे तर्फे नाशिक जिल्हा व नांदगाव तालुका पदाधिकारी यांची नियुक्ती करून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. बैठक संपल्यानंतर नांदगाव तालुका शाखेच्या वतीने अण्णा हजारे यांचा सत्कार करण्यात आला. नाशिक जिल्हाध्यक्ष निशिकांत पगारे, नांदगाव तालुका अध्यक्ष भीमराज लोखंडे, कादिर शेख, ॳॅड. फरीदा मिठाईवाला, अत्तार, वसीम शेख, इम्रान शेख सोबत नाशिक जिल्हा व नांदगाव तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
