
नांदगाव: (प्रतिनिधी) नांदगाव नजीक फुलेनगर ग्रामपंचायत च्या सरपंचाच्या उपस्थितीत उपसरपंच पदी रामदास रंगनाथ जगधने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित त्यांनी उपसरपंच रामदास जगधने यांचे गुलाब पुष्प व गुलाल टाकून स्वागत केले. याप्रसंगी ग्रामपंचायत येथे सरपंचांचे सरपंच श्रीमती उषा बाई पाटील यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये रामदास जगणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगीसरपंच उषा बाई पाटील, राहुल गायकवाड, हिराबाई कारभारी माळी, मीना सुनील माळी, शितल जगधने, ग्रामसेवक सुनील मोकळं, आदी उपस्थित होते दरम्यानमनोज पांडे ,दत्तात्रय महाजन ,कृष्णा खैरनार, शिवाजी जगदाळ माजी सरपंच , एस आर जगधने, पोपट जगधने, प्रभाकर जगधने व फुले नगर ग्रामस्थ यांनी उपसरपंच पदाच्या निवडीचे स्वागत केले यावेळी उपसरपंचांवरती जेसीबीच्या माध्यमातून गुलाब पुष्प आणि गुलाल उधळण्यात आला नागरिकांच्या व ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्याने आपण गावाच्या सर्वांगीण कामासाठी सहकार्य करू अशी अपेक्षा नवनिर्वाचित उपसरपंच रामदास जगधने यांनी व्यक्त केले

