
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३००३ वा दिवस
भविष्याच्या पोटी काय दडले आहे हे मी बघत नाही. परंतु माझ्या मनच्चक्षूंसमोर एक दृश्य मला अगदी सुर्यप्रकाशाप्रमाणे स्पष्ट दिसत आहे, ते हेच की माझी प्राचीन मातृभूमी पुनः जागी झाली आहे, ती आपल्या सिंहासनावर पुनः विराजमान झाली आहे, तिच्यामधे नवशक्तीचा संचार झाला आहे आणि पूर्वीपेक्षा ती अधिक गौरवान्वित झाली आहे. शांतीच्या, प्रेमाच्या, कल्याणाच्या, मंगलमय वाणीने सर्व जगात तिच्या नावाचा जयघोष करा. आपला देश पुन्हा एकदा सर्वोच्च स्थानी विराजमान होऊन, सामर्थ्यशाली व्हावा, जर असे परिवर्तन होण्यासाठी मला साधन बनता आले, तर माझ्या जीवनाचे काही अंशी सार्थक झाले असे मला वाटेल.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २९ श्रावण (नभमास) शके १९४७
★ श्रावण कृष्ण /वद्य १२
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. २० ऑगस्ट २०२५
★ १९४४ भारतातील संगणक क्रांतीचे उद्गाते, भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान राजीव गांधी यांचा जन्मदिन.
★ २०१३ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या, स्मृतीदिन.
★राष्ट्रीय सद्भावना दिन.
★अक्षय ऊर्जा दिन.
