
मविप्र शैक्षणिक संकुल मखमलाबाद येथे समाज दिनानिमित्त ध्वजारोहण करताना माजी महापौर प्रकाश मते.मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे व उपस्थित सर्व मान्यवर.
मखमलाबाद (वार्ताहर) = मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,अभिनव बाल विकास मंदिर,होरायझन ॲकॅडमी,कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मखमलाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने मविप्र संस्थेचे आद्य कर्मवीर रावसाहेब थोरात यांची जयंती “समाजदिन” म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे व प्रमुख पाहुणे माजी महापौर प्रकाश मते उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते शिवपुतळा पूजन,सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.तसेच राजर्षी शाहू महाराज,कर्मवीर रावसाहेब थोरात,कर्मवीर गणपत दादा मोरे,कर्मवीर डी.आर.भोसले,कर्मवीर काकासाहेब वाघ,कर्मवीर भाऊसाहेब हिरे,कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे,कर्मवीर ॲड.बाबुरावजी ठाकरे,कर्मवीर ॲड.विठ्ठलराव हांडे,कर्मवीर डॉ.वसंतराव पवार, मखमलाबादचे मुलकी पाटील पंढरीनाथ झुंगाजी पिंगळे, सहकार महर्षी पोपटराव महादेव पिंगळे या सर्व मविप्र कर्मवीरांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. एन.सी.सी.आर्मी सी.एच.एम.कु. किमेश ह्याळीज याने प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.प्रमुख पाहुणे माजी महापौर प्रकाश मते यांच्या शुभहस्ते ध्वजपूजन करून मविप्र समाजदिन ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.संगीत शिक्षक तुकाराम तांबे यांच्या गीत मंचाने राष्ट्रगीत,समाज गीत अतिशय सुरेल आवाजात सादर केले. इयत्ता ५ वी ते १० वी व ज्युनिअर कॉलेज विद्यार्थ्यांचे रांगोळी,पुष्परचना व सलाड प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.यासाठी सर्व शिक्षक व प्राध्यापक यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.वसुंधरा क्लब तर्फे मान्यवरांच्या शुभहस्ते विविध वृक्षांचे वृक्षारोपण शालेय परिसरात करण्यात आले.शालेय गीत मंचाने स्वागत गीत सादर केले.प्राचार्य संजय डेर्ले यांनी प्रास्ताविक केले.प्रास्ताविकात त्यांनी शालेय प्रगतीचा व कार्यक्रमाचा आढावा घेतला. तसेच त्यांनी सर्वांचे शाब्दिक स्वागत केले.मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे यांच्या शुभहस्ते प्रमुख पाहुणे माजी महापौर प्रकाश मते यांचा शाल पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.प्राचार्य संजय डेर्ले यांच्या शुभहस्ते सर्व मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.कु.मयुरी ठाकरे व ज्येष्ठ शिक्षक प्रमोद पगार यांनी समाज दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.मनोगतात त्यांनी कर्मवीरांच्या जीवनकार्याची सखोल माहिती दिली.होरायझन शालेय समितीचे अध्यक्ष शंकरराव पिंगळे,अभिनव शालेय समितीचे अध्यक्ष निवृत्ती महाले, क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे विश्वस्त नारायणराव काकड यांनी आपल्या मनोगतात कर्मवीर रावसाहेब थोरात यांचे स्मरण करून सर्व कर्मवीरांना अभिवादन केले.कर्मवीरांनी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झालेले आहे. हजारो,लाखो विद्यार्थ्यांना या शैक्षणिक संस्थेचा लाभ झाला असून त्यामुळे सर्वांची शैक्षणिक प्रगती झालेली आहे.मविप्रचे माजी संचालक सचिन पिंगळे यांनी आपल्या मनोगतात मविप्रच्या सर्व कर्मवीरांना अभिवादन केले.मखमलाबादचे मुलकी पाटील पंढरीनाथ झुंगाजी पिंगळे व सहकार महर्षी पोपटराव महादेव पिंगळे यांनी मखमलाबाद विद्यालयाच्या स्थापनेसाठी केलेल्या कार्याचा त्यांनी उल्लेख केला.तसेच संस्थेच्या प्रगती विषयी समाधान व्यक्त केले.माजी महापौर प्रकाश मते यांनी आपल्या मनोगतात कर्मवीर रावसाहेब थोरात व सर्व कर्मवीरांना अभिवादन केले. त्यांनी सांगितले की चार-पाच विद्यार्थ्यावर सुरू झालेली ही संस्था आज तिने वटवृक्षात रूपांतर केलेले आहे,याचा सर्वांना अभिमान वाटतो.मविप्र संस्था आज महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था आहे.या प्रगतीत कर्मवीरांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे.कर्मवीरांचे स्मरण करून आपण सर्वांनी आज जगाच्या प्रगती बरोबर चालावयास हवे असेही त्यांनी शेवटी सांगितले.मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सर्व कर्मवीरांना अभिवादन केले. त्यांनी सांगितले की,कर्मवीरांचे हे कार्य अतिशय महान आहे.त्यांनी मविप्र संस्थेच्या प्रगतीचा व शालेय प्रगतीचा आढावा घेतला.

तसेच समाज दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.इ.१० वी,१२वी गुणवंत विद्यार्थी,स्कॉलरशिप,कला,क्रीडा क्षेत्रातील राज्य,राष्ट्रीय पातळीवरील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक अनिल पगार,सविता आहेर,दिपाली कोल्हे,सुनिता उशीर यांनी तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य रावसाहेब उशीर यांनी केले.कार्यक्रमास माजी मविप्र संचालक सचिन पिंगळे,अभिनव शालेय समितीचे अध्यक्ष निवृत्ती महाले,उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष पंडितराव पिंगळे,होरायझन शालेय समितीचे अध्यक्ष शंकरराव पिंगळे,शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष पहिलवान वाळू काकड,रामचंद्र अर्जुन काकड (सर) सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष रामदास पिंगळे,श्री छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस संजय फडोळ, क्रांतिवीर वसंतराव नाईक शैक्षणिक संस्थेचे विश्वस्त नारायणराव काकड,ज्येष्ठ सभासद विश्वनाथ पिंगळे, चंद्रभान पिंगळे,दिलीपराव पिंगळे,परसराम पिंगळे शंकरराव पिंगळे,नरेंद्र मुळाणे,शांताराम पिंगळे,नारायण पिंगळे,पंढरीनाथ पिंगळे,नामदेव पिंगळे,वामनराव पिंगळे,पोपटराव बोराडे,प्रभाकर पिंगळे,चित्रा तांदळे,प्रमोद पालवे,शिवाजी पिंगळे,संजय पिंगळे,प्रभाकर फडोळ,बाळासाहेब पिंगळे,विक्रम कडाळे,प्रदीप पिंगळे,भास्कर तांबे,आत्माराम भोर,पत्रकार सुनील बुणगे,प्रभाकर खोडे,प्रमोद शिंदे,मविप्र सभासद,ग्रामस्थ,प्राचार्य संजय डेर्ले,कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.मनीषा आहेर,अभिनव बाल विकास मंदिरचे मुख्याध्यापक प्रमोद ठाकरे,होरायझन ॲकॅडमीच्या मुख्याध्यापिका भाग्यश्री बारी,उपप्राचार्य रावसाहेब उशीर,पर्यवेक्षक संजय हांडगे,जुनियर कॉलेज प्रमुख विकास थोरात,एन.सी.सी.आर्मी ऑफिसर अशोक गावले, एन.सी.सी.नेव्हल ऑफिसर दयाराम मुठाळ,स्काऊट प्रमुख बाळासाहेब पवार,शालेय पंतप्रधान कु.आकांक्षा कथार,उपपंतप्रधान कु.आयुष पिंगळे,शालेय मंत्रिमंडळ,सर्व प्राध्यापक शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी एन.सी.सी.आर्मी, नेव्हल पथक व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.* .*
