
नांदगाव (प्रतिनिधी ) नांदगाव येथील व्ही.जे. हायस्कूल माध्यमिक विद्यालयात तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात पार पडल्या.या स्पर्धा 14 वर्ष वयोगट ,17 वर्ष व 19 वर्षाखालील वयोगटात घेण्यात आल्या.19 वर्ष वयोगटातील मुलांच्या गटात सौ.क.मा.कासलीवाल माध्यमिक विद्यालयाने विजेतेपद पटकावले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात कासलीवाल विद्यालयाने मनमाड कॉलेजवर दणदणीत विजय मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला.तर याच सर्धेत 14 व 17 वर्षाखालील वयोगटात मुलांच्या व मुलींच्या गटात कासलीवाल विद्यालयाने चारही सामन्यात उपविजेतेपद मिळविले. तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेतील हे उल्लेखनीय यश मिळविल्याबद्दल संस्थेचे चेअरमन मा. सुनीलकुमारजी कासलीवाल तसेच उपाध्यक्ष सुशील कासलीवाल, सचिव विजय चोपडा,प्रशासक प्रकाश गुप्ता ,सहसचिव प्रमिलाताई कासलीवाल,विश्वस्त रिखबचंद कासलीवाल,जुगलकिशोर अग्रवाल, महेंद्र चांदिवाल, आनंद कासलीवाल, यांनी सर्व खेळाडूंचे व क्रीडा शिक्षक संजय त्रिभुवन यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या . तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्वश्री गोरख डफाळ,विशाल सावंत, प्राचार्य मणी चावला, यांनी देखील या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक संजय त्रिभुवन,अनिकेत राऊत, हर्षदा भालेराव यांचे मार्गदर्शन लाभले.
