
नांदगाव (प्रतिनिधी) नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्व.मि.भि छाजेड विद्यामंदिर नांदगाव येथे दरवर्षीप्रमाणे शाडू माती पासून पर्यावरणपूरक गणपती बनवण्याची कार्यशाळा पार पडली या कार्यशाळेमध्ये इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक गणेश मूर्ती साकारल्या, विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी तसेच, शाडू मातीची गणेशमूर्ती ही पर्यावरणपूरक मानली जाते, कारण ती नैसर्गिक मातीपासून तयार केली जाते आणि पाण्यात लवकर विरघळते, त्यामुळे जलप्रदूषण टाळता येते.

या हेतूने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले . कार्यशाळेचे उद्घाटन शालेय समितीचे अध्यक्ष श्री विजय अण्णा परदेशी यांच्या हस्ते झाले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ जाधव मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यशाळेत व्ही.जे. हायस्कूल येथील कलाशिक्षक श्री चव्हाण सर व श्री शशिकांत खांडवी सर यांनी गणेश मूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले व विद्यार्थ्यांना गणेश मूर्ती चे सर्व भाग बनवण्याचे कौशल्य सांगितले तसेच सर्व विद्यार्थ्यांनी या गणेश मूर्ती घरी बसवण्याचा संकल्प केला

. या कार्यशाळेसाठी प्रमुख म्हणून श्री महाले ,श्री एकलारे सर यांनी काम पाहिले . सूत्रसंचालन श्री बुरकुल सर यांनी केले तसेच सर्व शिक्षकांचे व सेवक कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले
