
नाशिक (प्रतिनिधी )स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित श्रीमान टी.जे. चौहान माध्यमिक विद्यालय मोरवाडी येथे पर्यावरण पूरक गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली .यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उज्वला माळी प्रमुख पाहुण्या सेवानिवृत्त कलाशिक्षिका जयश्री पवार , पर्यवेक्षक कीर्तीकुमार गहाणकरी व्यासपीठावर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना गणपती मूर्तीचे बनवण्याचे प्रशिक्षण देता देता पाहुण्यांनी अतिशय देखणी मूर्ती निर्माण केली. शाडू माती पासून सुंदर सुंदर मूर्ती बनवता येतात याची प्रचिती मुलांना आली व विद्यार्थी मूर्ती बनवण्यात रममाण झाले. पर्यावरणपुरक उपक्रमामध्ये सतत अग्रेसर असलेल्या या विद्यालयात विद्यार्थ्यांनी हिरहिरीने सहभागी होत सुंदर गणेश मूर्ती बनवल्या व या सर्जनशील उपक्रमातून निखळ आनंद घेतला. आपण आपल्या हातानी बनवलेल्या गणेश मूर्तीना पाहताना छोटे मूर्तिकार हरखून गेले होते. हरित सेना प्रमुख जितेंद्र गायकवाड, यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. हरित सेना सदस्य दामू गावित, दिलीप पानपाटील यांनी कार्यशाळा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
