
लेखक:- श्रीमती निवेदिता सांगळे/बुरकुलसहाय्यक शिक्षिका व्ही.जे. हायस्कूल, नांदगांव (नाशिक)
विद्यार्थी मित्रांनो , आपल्या दैनंदिन जीवनात अनेक अडचणींना आपण सामोरे जात असतो अगदी बालवयापासून आपणास प्रश्न पडत असतात नुकतेच अहिल्यानगर येथे एका कार्यक्रमानिमित्त गेले असता तिथे एका छोट्या संशोधिकेशी भेट झाली. तिने सांगितले की, विद्यार्थ्यांनी आपल्याला आलेल्या अडचणींना घाबरून न जाता त्यावर जे उत्तर शोधले आहे किंवा जो पर्याय काढला आहे तो तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवायला हवा आपण प्रत्येक वेळेला अडचणीवर मात करतो आणि आपल्याजवळ जर साहित्य उपलब्ध नसेल तर आपण काहीतरी जुगाड करतो हा देखील एक संशोधनाचा भाग होऊ शकतो हे आपल्याला माहितच नसते मग आपण काय करायला हवे आपल्या जवळ एक छोटीशी डायरी जवळ ठेवा जेव्हा अडचण येतात त्या अडचणी डायरीमध्ये नोंदवून घ्याव्यात आणि त्यावर आपण काय उपाययोजना केली आहे हे देखील त्यामध्ये नोंदवून ठेवा आपण काय करू शकतो यासाठीचे विविध उपाय योजना लिहाव्यात आपल्याला संशोधन करायचे म्हणजे नेहमीच काहीतरी मोठे प्रोजेक्ट करायचा किंवा खूप सगळी माहिती जमा करायची असा काही भाग नसतो अगदी छोट्या छोट्या गोष्टी देखील संशोधनाचा भाग होतो हे आपल्याला शोधावे लागते जसे की मला भेटलेल्या अंकिता नगरकर या ताईंनी वयाच्या अगदी सोळाव्या वर्षी एक संशोधन केले आणि त्याचे पेटंट स्वतःच्या नावावर नोंदवून घेतले डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते तिला त्यासाठी पारितोषिकही प्राप्त झाले जेव्हा तिच्या संशोधनाचा विषय ऐकला तर असे लक्षात आले की आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनात येणारी जी अडचण होती आणि त्यावर त्या ताईने उपाययोजना करून एका विज्ञान प्रदर्शनामध्ये तिने आपला विषय मांडला आणि त्यासाठी तिला हेच पारितोषिक मिळाले विषय होता काम करत असताना अचानक स्टेपलरच्या पिना जर संपल्या तर त्या सहज उपलब्ध होत नाहीत त्या वेळेला अडचणी येतात म्हणूनच स्टेपलर मध्ये जेव्हा आपण नवीन पिना करतो त्यावेळेला तिने शेवटच्या काही पिलांना रंग लावला रंगीत पिना आल्या की आपण समजायचे आपल्या स्टेपलरच्या पिना लवकरच संपणार आहेत आणि त्यावर उपाय म्हणून आपण पुढील स्टेपलरच्या पिना शोधून ठेवायला हव्यात. हे आपल्याला त्यावेळी लक्षात येते ताईच्या याच संशोधनासाठी तिला बक्षीस मिळाले आणि पेटंट ही तिच्या नावावर वयाच्या सोळाव्या वर्षी नोंदविण्यात आले. आपणही अशा प्रकारे विविध समस्यांवर उपाययोजना शोधत असतो पण आपण त्या गोष्टीकडे संशोधक वृत्तीने न पाहिल्यामुळे आपल्याला त्याचे महत्त्व पटत नाही म्हणूनच आता आपल्याला आपल्या बुद्धीला जिद्दी असुवृत्तीला जागृत ठेवून अशा प्रकारे आपल्या कामातील सातत्य तप्तरता नियमितता विज्ञान प्रदर्शनातील सहभाग घेत असताना नवीन संकल्पना त्यामध्ये आपण प्रदर्शित करायला हव्यात आपल्यातील संशोधक वृत्ती कुठल्याही बंधनात नसते तिला वयाचे स्थळाचे शिक्षणाचे कसलेही बंधन नाही कारण आपण भारत देशातील नागरिक असताना विकसित राष्ट्रांच्या यादीत येण्यासाठी आपल्या देशात संशोधनाला आणखीनही खूप वाव आहे तुम्हाला नव्या पिढीचे संशोधक होण्यासाठी शुभेच्छा देते.
