
नाशिक (प्रतिनिधी)नाशिक रोड व नाशिक शहर शाखा यांच्यावतीने शनिवार दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी *कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे* आयोजन करण्यात आले होते. गांधीनगर येथील जनता विद्यालयांमध्ये दुपारी ०१ ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत संपन्न झालेल्या या शिबिरामध्ये २५ प्रशिक्षणार्थी कार्यकर्ते ,पदाधिकारी व काही नवीन सभासद सहभागी झाले होते. नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.आशा लांडगे, प्रधान सचिव अरुण घोडेराव व विविध उपक्रम विभागाचे जिल्हा कार्यवाह विजय बागुल यांनी चळवळीचे गीत गाऊन या शिबिरास सुरुवात केली.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हितचिंतक सेवानिवृत्त प्राचार्य विठ्ठल नागरे यांच्या हस्ते पाण्याचादिवा पेटवून शिबिराचे उदघाटन करण्यात आले यावेळी नागरे सरांनी अंनिसच्या भूमिकेशी सुसंगत असे उदघाटकीय मनोगत व्यक्त केले.नंतर जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. आशा लांडगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यानंतर अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे यांनी अंनिसची व्यापक वैचारिक भूमिका १) पूर्व इतिहास २) पंचसूत्री ३)देवधर्म-भूमिका ४)सहभाग कसा घ्यावा ५)शाखा स्थापना ६)कार्यकर्त्यांचे प्रकार ७)शाखा प्रकार ८)शाखा कशी चालते ९)पदं व जबाबदाऱ्या या मुद्द्यांवर अतिशय विस्तृत, मुद्देसूद व अभ्यासपूर्ण मांडणी केली

. महेंद्र दातरंगे यांनी काही चमत्कारांचे सादरीकरण करून त्यांचे वैज्ञानिक दृष्टीने विश्लेषण केले. जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.आशा लांडगे व नाशिक जिल्हा प्रधान सचिव अरुण घोडेराव यांनी *वैज्ञानिक जाणीवा* या विषयावर दोन भागांमध्ये अत्यंत सविस्तर, मुद्देसूद व अभ्यासपूर्ण मांडणी केली. तसेच अंनिपचे संपादक मंडळ सदस्य राजेंद्र फेगडे यांनी अंनिप बद्दल माहिती सांगून प्रशिक्षणार्थींना वर्गणीदार होण्याचे आवाहन केले. यावेळी अंनिसच्या शिबिरामध्ये प्रथमच सहभागी झालेल्या नवीन शिबिरार्थींनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या व सकारात्मक प्रतिसाद देऊन संघटनेच्या कामात सहभागी होण्याचे आश्वासन दिले. शेवटी अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. गोराणे यांनी शिबिरात झालेल्या वैचारिक चर्चेचे सारांश रूपाने विवेचन केले. शिबिरामध्ये जिल्हा प्रधान सचिव नितीन बागुल, नाशिक शहर कार्याध्यक्ष कोमल वर्दे, नाशिक शहर प्रधान सचिव बाळासाहेब शिराळ ,विधी विभागाचे कार्यवाह ॲड.सुशीलकुमार इंदवे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय समन्वयक प्रा.डॉ.सुदेश घोडेराव,विजय खंडेराव, शिरसाट, रंजन लोंढे, लोंढे मॅडम, कपिल शिंदे , प्रा. निकिता मोरे,पत्रकार सारिका गुजराथी ,अमोल कोल्हे इ. नवीन शिबिरार्थी सहभागी झाले होते.आपल्या प्राध्यापकीय शैलीमध्ये व अलंकारिक शब्दांनी संपूर्ण शिबिराचे सूत्रसंचालन नाशिक रोड शाखेच्या प्रधान सचिव प्रा. डॉ. सिल्केशा अहिरे यांनी केले तर सुंदर अशा काव्यपंक्तींची पेरणी करत नाशिक रोड शाखेच्या कार्याध्यक्ष ॲड.स्वाती वाहुळ मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले.विविध उपक्रम विभागाचे जिल्हा कार्यवाह विजय बागुल यांनी महाकवी वामनदादा कर्डक यांचे *माणसा इथे मी तुझे गीत गावे* हे गीत गाऊन शिबिराचा समारोप केला.
