
.उरण दि १६(विठ्ठल ममताबादे )रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज महालण विभाग फुंडे येथे लायन्स क्लब वीर वाजेकर कॅम्पस या नावाने स्थापन झाला. या क्लबचा इन्स्टॉलेशन सोहळा नुकताच वीर वाजेकर महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला.प्रभारी प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर यांनी पुढाकार घेऊन महाविद्यालयात क्लबची स्थापना केली. त्याची उद्दिष्टे नमूद करून सर्व मान्यवरांचे स्वागत केले.

सदर सोहळ्याचे निमित्ताने वाशी लायन्स क्लबचे लायन विजय पाटील यांनी लायन्स क्लबची स्थापना, उद्देश व विस्तार याची सविस्तर माहिती दिली. पी एम एफ जे लायन मिलिंद पाटील उलवे जेम्स क्लबचे ऍडमिनिस्ट्रेटर यांनी लायन्स क्लबची कार्यपद्धती, हाती घेतलेले उपक्रम,विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांची माहिती दिली.याप्रसंगी लायन्स क्लब वीर वाजेकर कॅम्पसची नवनियुक्त अध्यक्ष लायन कु. गार्गी आमोद ठक्कर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात आरोग्य, पर्यावरण, सामाजिक सेवा अशा उपक्रमाबरोबरच युवकांमध्ये कॅपॅसिटी बिल्डिंग आणि करिअर गायडन्स या क्षेत्रांमध्ये सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचे उद्दिष्ट व्यक्त केले.

लायन मिलिंद पाटील यांनी अध्यक्ष व इतर सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या समजावून सांगितल्या. उपाध्यक्ष म्हणून लायन कुमारी प्रणाली सकपाळ, सेक्रेटरी म्हणून लायन तनिष्क थळी, मेंबरशिप चेअरमन म्हणून लायन दीपांशू तांडेल व लायन संचिता पाटील या सर्व पदाधिकाऱ्यांना बॅचेस देऊन सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी लायन सागर चौकर,लायन मोनिका चौकर, लायन दीपक लायन घरत इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
