
उरण दि १६(विठ्ठल ममताबादे )
सीआयएसएफ युनिट जेएनपीए शेवा येथे पहिला मूलभूत बंदर सुरक्षा प्रशिक्षण दिनांक १४.०८.२०२५ ते २९.०८.२०२५ रोजी सुरु करण्यात आले आहे, जो ०२ आठवड्यांचा असेल

. प्रशिक्षणाच्या उदघाटना साठी पद्माकर संतू रणपिसे, आयपीएस सीआयएसएफ अतिरिक्त महासंचालक (दक्षिण) नवी मुंबई, उन्मेष शरद वाघ (जेएनपीए अध्यक्ष), अभिषेक गोयल, आयपीएस, सीआयएसएफ महानिरीक्षक, नवी मुंबई, श्रीमती ममता राहुल, आयपीएस, सीआयएसएफ उपमहानिरीक्षक नवी मुंबई, श्रीमती मनीषा जाधव, महाव्यवस्थापक (प्रशासन आणि विभाग), गिरीश थॉमस मुख्य व्यवस्थापक (वाहतूक जेएनपीए), बाळासाहेब पवार उपसंरक्षक जेएनपीए, मुंबईस्थित जेएनपीएचे वरिष्ठ अधिकारी, सीआयएसएफ चे वरिष्ठ अधिकारी, प्रशिक्षक आणि विविध एजन्सीं सहभागी झाले होते.

भारतीय बंदरांच्या विशिष्ट सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे, मग ते प्रवेश नियंत्रण असो, मालवाहू सुरक्षा असो किंवा सायबर धोके आणि तस्करी यासारख्या उदयोन्मुख आव्हानांना तोंड देण्यासाठी अभ्यासक्रम तयार करण्यात आले असून पुढील दोन आठवड्यात पर्यवेक्षक आणि इतर पदांवर असलेल्या ४० सहभागींना ऑपरेशनल प्रक्रिया, वर्तन ओळखण्याचे तंत्र, संकट प्रतिसाद आणि आंतर-समन्वय यावर व्यापक प्रशिक्षण दिले जाईल.यामागील उद्देश केवळ प्रक्रिया सामायिक करणे नाही तर एक समान सुरक्षा संस्कृती निर्माण करणे आहे जिथे सीआयएसएफ आणि खाजगी सुरक्षा कर्मचारी समान वृत्ती, दक्षता आणि व्यावसायिक कार्यक्षमतेने काम करतील.

