
🛣️ महाराष्ट्रात फास्टॅग वार्षिक पास कुठे चालणार ? वाचा ‘या’ 96 टोलनाक्यांची तुम्ही जर नेहमी महामार्गावरून प्रवास करत असाल, तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. 15 ऑगस्ट 2025 पासून FASTag साठी वार्षिक पास सुविधा सुरू होत आहे. 3,000 रुपयांमध्ये मिळणाऱ्या या पासमुळे तुम्हाला वर्षभर किंवा 200 टोल क्रॉसिंगपर्यंत विनाअडथळा प्रवास करता येईल. हा पास फक्त राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेसाठी असून, राज्य महामार्ग किंवा पालिकेच्या टोल नाक्यांवर तो चालणार नाही.
🔸 96 टोलनाक्यांची संपूर्ण यादी*
1. चारोटी – सुरत-दहिसर
2. खानीवाडे – सुरत-दहिसर बायपास
3. अहमदनगर बायपास – अहमदनगर बायपास
4. तिडगुंडी – सोलापूर-विजापूर
5. तसावडे – सातारा-कागळ
6. किणी – सातारा-कागळ
7. सावळेश्वर – पुणे-सोलापूर
8. वरवडे – पुणे-सोलापूर
9. पाटस – पुणे-सोलापूर
10. सरडेवाडी – पुणे-सोलापूर
11. आनेवाडी – खंडाळा-सातारा
12. खेड-शिवपूर – वेस्टर्ली डायव्हर्जन टू पुणे, कात्रज रियललाइनमेंट आणि कात्रज-सारोळे
13. चांदवड – पिंपळगाव-धुळे
14. लालींग – पिंपळगाव-धुळे
15. बसवंत – पिंपळगाव-नाशिक-गोंडे
16. घोटी – वडापे-गोंडे
17. अर्जुनल्ली – वडापे-गोंडे
18. तामलवाडी – सोलापूर-येडशी
19. येडशी – सोलापूर-येडशी
20. धोकी – एंड ऑफ आणे घाट टू स्टार्ट ऑफ अहमदनगर
21. दुमहरवाडी – माळशेज घाट टू आणे घाट
22. हिवरगाव पावसा – खेड-सिन्नर
23. फुलवाडी – सोलापूर-एमएएच/केएनटी बॉर्डर
24. तळमोड – सोलापूर-एमएएच/केएनटी बॉर्डर
25. चाळकवाडी – खेड-सिन्नर
26. वळसांग – अक्कलकोट-सोलापूर
27. नंदानी – सोलापूर-विजापूर
28. चाचाडगाव – नाशिक-पेठ
29. अनकधाळ – सांगली-सोलापूर (पॅकेज-१)
30. बोरगाव – सांगली-सोलापूर (पॅकेज-१
31. इचगाव – सांगली-सोलापूर (पॅकेज-३)
32. पिंपरवाळे – सिन्नर-शिर्डी
33. डोंगराळे – कुसुंबा ते मालेगाव
34. पेनूर – मोहोळ-वाखरी आणि वाखरी-खुडूस
35. पिंपरखेड – चाळीसगाव-नांदगाव-मनमाड
36. उंडेवाडी – पाटस-बारामती
37. बंपिप्री – अहमदनगर-घोगरगाव-सोलापूर बॉर्डर
38. निमगाव खालू – अहमदनगर-किनेटिक चौक ते वाशुंडे फाटा
39. पंडणे – सरद-वाणी पिंपळगाव
40. बावडा – इंदापूर-बोंडाळे (संत तुकाराम महाराज पालखी मार्ग)
41. भवानीनगर – खुद्दूस-धर्मपुरी-लोनांद
42. बडेवाडी – खरवडी कासार-जंक्शन
43. गोंधखैरी – नागपूर-कोंढळी
44. करंजा घाडगे – कोंढळी-तळेगाव
45. निंभी – नांदगाव पेठ-मोरशी
46. नांदगाव पेठ – तळेगाव-अमरावती
47. कुरणखेड – अमरावती-चिखली (पॅकेज-१)
48. तरोडा कसबा – अमरावती-चिखली (पॅकेज-३)
49. उंद्री – खामगाव-चिखली
50. तुप्तकळी – आरणी-नायगाव बांधी
51. मेडशी-सावरखेडा – अकोला-मेडशी (पॅकेज-१)
52. धुम्का-तोंडगाव – मेडशी-बुलढाणा (पॅकेज-२)
53. करोडी – औरंगाबाद-करोडी
54. हातनूर – करोडी-तेलवाडी
55. माळीवाडी-भोकरवाडी – येडशी-औरंगाबाद
56. पादळसिंगी – येडशी-औरंगाबाद
57. पारगाव – येडशी-औरंगाबाद
58. वैद्याकीन्ही – मांजरसुम्बा-चुंभळीफाटा
59. नायगाव – मंठा-पातुर
60. लोणी – परतूर-माजलगाव
61. शेंबळ – वरोरा-वणी
62. हिरापूर – गडचिरोली-मूल
63. खरबी – नागभीड-आर्मोरी
64. केलापूर – वडनेर देवधरी केळापूर
65. हुस्नापूर – यवतमाळ-वर्धा
66. निअर हळदगाव – वर्धा-बुटीबोरी
67. वडगाव – कळंब राळेगाव वडकी
68. उमरेड – कळंब राळेगाव वडकी
69. सोंगिर – एमपी/एमएच बॉर्डर – धुळे
70. शिरपूर – एमपी/एमएच बॉर्डर – धुळे
71. बोरविहीर – बोध्रे-धुळे
72. दासरखेड – नांदुरा ते चिखली
73. नाशिराबाद – चिखली ते तारसोड
74. सुबगव्हाण – तारसोड ते फागणे
75. दरोडा – बोरखेडी-जाम-वडनेर
76. नंदुवाफा – सीजी/एमएच बॉर्डर टू वैनगंगा ब्रीज
77. बोरखेडी – नागपूर हैदराबाद
78. पांजरि – नागपूर बायपास
79. खुमारी – एमपी/एमएच बॉर्डर नागपूर
80. कामठी कन्हान – कामठी कन्हान बायपास नागपूर
81. मठानी – नागपूर ते वैनगंगा
82. सेलू – सावनेर-धापेवाडा-काल्मेश्वर गोंडखैरी
83. चंपा – नागपूर-उमरेड
84. भागेमारी – नागपूर-बैतुल
85. मिलानपूर – नागपूर-बैतुल
86. खांबारा – नागपूर-बैतुल
87. खडका – रिंग रोड नागपूर पॅकेज – १
88. पावनगाव – रिंग रोड नागपूर पॅकेज – २
89. सेलू अंबा – लोखंडी सावरगाव ते रेणापूर
90. अष्टा – औसा ते चाकूर
91. मालेगाव – चाकूर ते लोहा
92. परडी माक्ता – लोहा ते वारंगफटा
93. बिजोरा – वारंगा ते महागाव
94. आशीव – तुळजापूर ते औसा
95. सालावा झारोडा – पांगारे ते वारंगा फाटा
96. भांब राजा – महागाव ते यवतमाळ
