
मनमाड ( प्रतिनिधी )संत बार्णबा प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रेव्ह.प्रवीण घुले पाळक साहेब (संत बार्णबा चर्च चे प्रिस्ट इन्चार्ज )यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी संत बार्णबा प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री.डी यु.अहिरे सर, कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री व्ही यु कराड सर, मनमाड ग्रामीण पोलीस दलाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. हेमंतजी भंगाळे सर, सौ.संगीता वाटपाडे मॅडम (मनमाड ग्रामीण पोलीस कॉन्स्टेबल) उद्योजक तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री.पारस रवींद्र सूर्यवंशी, गणेश भालेराव सामाजिक कार्यकर्ते,लेलीडर आनंद अस्वले, (संत बार्णबा देवालय). सामाजिक कार्यकर्त्या सौ.सुरेखा प्रशांत काळे,प्राथमिक विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ.अहिरे मॅडम तसेच माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री.वेताळ सर तसेच विविध सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती तसेच पालक वर्ग उपस्थित होते.सर्व प्रमुख पाहुणे तसेच मान्यवर तसेच सामाजिक कार्यकर्ते यांचा संत बार्णबा विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. गतवर्षी संत बार्णबा माध्यमिक विद्यालयाचे इयत्ता १० वी तील प्रथम द्वितीय वर तृतीय आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. माध्यमिक विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ.बेन्सन मॅडम यांनी संविधान वाचन केले. तसेच माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री.रसाळ सर यांनी ध्वज प्रतिज्ञा तसेच अंमली पदार्थाचे सेवन न करण्याची शपथ विद्यार्थ्यांकडून तसेच पालकांकडून घेतली.भारताच्या स्वातंत्र्यदिनी विद्यालयामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. यामध्ये विशेष संचलन, कवायत प्रकार, देशभक्तीपर गीते साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी पालकांची मने जिंकून घेतली. सामाजिक कार्यकर्त्या सौ.सुरेखा प्रशांत काळे यांनी गरजू तसेच होतकरू विद्यार्थ्यांना वीस गणवेश वाटप केले. रेव्ह.प्रवीण घुले पाळक साहेब यांनी संत बार्णबा विद्यालयामध्ये वर्षभर जे विविध उपक्रम चालतात त्याविषयी कौतुक केले. तसेच संस्था विद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्द आहे असे प्रतिपादन केले.प्रमुख पाहुणे मा.श्री.API हेमंत.जी.भंगाळे सर मनमाड ग्रामीण पोलीस निरीक्षक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की ह्या जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही त्यांनी आपल्या स्वतःच्या कौटुंबिक परिस्थितीची विद्यार्थ्यांना ओळख करून देताना सांगितले की मी स्वतः दहावीला चार वेळा नापास होतो तरी अपयशाने खचून न जाता जिद्दीच्या जोरावर यश संपादन केले. शेती करता करता शिक्षण घेऊन समाजामध्ये एक वेगळे स्थान त्यांनी निर्माण केले. आपल्या यशामध्ये मित्राचा कसा वाटा असतो हे त्यांनी सांगितले. त्यांची घरची परिस्थिती खूप हालाखीची होती. कठीण प्रसंगातून त्यांनी ध्येय कसे गाठावे याचा मूलमंत्र विद्यार्थ्यांना दिला. तसेच तरुणांनी अमली पदार्थांपासून दूर राहावे यासाठी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.कराड सर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विद्यालय कटिबद्ध असून पुढच्या वर्षी संस्थेच्या पुढाकाराने इयत्ता ११ वी चे वर्ग देखील सुरू करण्यात येत आहे असे सांगितले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.डी.यू अहिरे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अमली पदार्थ पासून स्वतःला दूर कसे ठेवता येईल व समाजामध्ये एक आदर्श नागरिक कसे होता येईल याविषयी अनमोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मा. श्री.एपीआय साहेब यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही अधिकारी होऊ शकतो असे सांगितले. रेव्ह.पाळक साहेब यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना केळी वाटप केली. तसेच अनकवाडे येथील प्रगतिशील शेतकरी श्री.राम ढाबळे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना बिस्कीट वाटप केले. यावेळी मोठ्या संख्येने पालक वर्ग तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रम पार पाडण्यास सांस्कृतिक समितीने मोलाचे योगदान दिले.
