
.पिंपरखेड -( प्रतिनिधी )कै.पुंडलिक पांडूरंग मवाळ विद्यालयात ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रसंगी प्रभात फेरी नंतर संस्थेचे सरचिटणीस मा. वसंतराव मवाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजाला सलामी दिल्या नंतर राष्ट्रगीत व राज्यगीत गायन करण्यात आले त्या नंतर लगेचच शासनादेशानुसार अतिशय शिस्तबद्धपणे सामुहिक कवायत घेण्यात आली. नंतर विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ व शिक्षक शिक्षकेतर सर्वांनी आमली पदार्थ विरोधी शपथ घेतली. कुमार पुष्कर इंगळे या विद्यार्थ्याने सर्वांना शपथ दिली. तसेच फेब्रुवारी/मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी परिक्षेत अनुक्रमे प्रथम पाच विद्यार्थ्यांना व प्रत्येक विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना दानशूरांनी दिलेल्या बक्षीसांचे प्रमुख अतिथींच्या हस्ते वाटप करण्यात आले. प्रसंगी विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर गीतांचे तालासुरात गायन करून वातावरण देशभक्तीमय करून टाकले. ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ उपक्रमांतर्गत विद्यालयात गेल्या पंधरवडाभर विविध उपक्रम घेण्यात आले. त्यात रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत घरावर तिरंगा झेंडा फडकवणे, सेल्फी वुईथ तिरंगा, व भाषणे घेण्यात आली.उपक्रमांचा आज शेवटचा दिवस होता. कार्यक्रमास विजय शिक्षण प्रसारक मंडळाच्या पदाधिकारी व संचालकांचे तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. काशिनाथ गवळी सर यांचे मार्गदर्शन लाभले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक संजय कांदळकर, श्रीमती अलका शिंदे, कैलास पठाडे, लक्ष्मण जाधव, उत्तम सोनवणे, संदीप मवाळ, श्रीमती अमिता पारखे, आबा सोनवणे, निलेश चव्हाण, हनुमंत जाधव व संदीपभाऊ मवाळ मित्रमंडळाने परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन जेष्ठ शिक्षक संजय कांदळकर यांनी मानले.
