
अंदरसूल (प्रकाश साबरे ) भारतीय सैन्य दलामध्ये भारत मातेची सेवा करून नुकतेच सेवानिवृत्त झालेले रामेश्वर पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री सचिनभाऊ कळमकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.स्कूल प्रिन्सिपल वंदना थोरात यांनी उपस्थित मान्यवरांचे शब्द सुमनानी स्वागत करत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.प्रमुख पाहुण्यांचे दर्शन क्षिरसागर च्या ग्रुपने संचलन करून सलामी देत स्वागत केले. सदर प्रसंगी पुस्तक प्रेमी संतोषजी पुंड यांनी लिहिलेल्या अक्काची जीवनगाथा या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.संस्था अध्यक्ष सचिन कळमकर यांच्या वाढदिवसानिमित्त स्कूलच्या वतीने सौ.सुनिता भनगडे यांनी शुभेच्छा देऊन थोडक्यात त्यांच्या कार्याचा आढावा दिला. सदर प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश साबरे यांनी आपल्या मनोगतातून सचिनभाऊ कळमकर यांनी अल्पावधीत आपल्या कार्यातून जिल्ह्यात नाव लौकिक मिळविल्याचे कौतुक करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. प्राचार्य वंदना थोरात यांनी यावर्षीचा बेस्ट टीचर अवॉर्ड घोषित करून बेस्ट टीचर सौ.सुनीता भनगडे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तसेच ओलंपियाड स्पर्धा गणित विषयाचा सर्वाधिक निकाल लागल्याने मार्गदर्शन करणाऱ्या सौ.वैशाली वाळेकर मॅडम यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर प्रसंगी संस्थेचे सरचिटणीस अचित कळमकर, उपाध्यक्ष विशाल कळमकर, संचालक संदिप जेजुरकर सर, माजी सरपंच मारुतीभाऊ जेजुरकर, माजी सरपंच विनोद जेजुरकर, नितीन राजोळे, राजाभाऊ क्षिरसागर,शिवाजी जेजुरकर, प्रकाश बोरजे तसेच गावातील जेष्ठ नागरिक व पदाधिकार तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वृंद कर्मचारी पदाधिकारी यांचे योगदान व सहकार्य लाभले
