
जळगाव निंबायती (वार्ताहर) येथील बालाजी महीला समुह ‘यु अॅण्ड मी’ अशासकीय संघटनेच्या कार्यालयात ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन व संस्थेचा तृतीय वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

संस्थेचे ध्वजपूजन मालेगांव तालुका पोलीस उपनिरीक्षक अशोक सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले तर ध्वजारोहण बालाजी महिला समुहाच्या सचिव प्रियंका अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी अहिल्यादेवी शिक्षण संस्थेचे सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे, सर्व संचालक मंडळ, गो. य. पाटील विद्यालयाचे प्राचार्य पी. एन. पवार, पर्यवेक्षक व्ही. डी. काळे, जि प. प्राथमिक शाळचे विद्यार्थी, शिक्षक,शिक्षिका, मुख्याध्यापक सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर जळगांव निंबायती पोलिस चौकीचे कर्मचारी, महसूल, आरोग्य, टपाल विभागाचे सर्व कर्मचारी, पंचक्रोशीतील विविध संस्थांचे पदाधिकारी, आजी-माजी सैनिक, प्रतिष्ठित नागरिक, तरुण युवकांसह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
