
.उरण दि १५(विठ्ठल ममताबादे )वर्षानुवर्षे संस्कृतीचे जतन करणारे राज्य महाराष्ट्र आणि मुंबई ओळखली जाते.आषाढ पूर्व संधेला दिव्यांची पूजा करून मराठी सणांची आणि धार्मिक सणांचा उत्साह घरोघरी दृष्टिपथास येतो. असाच एक धार्मिक सण म्हणजे मंगळागौर. निसर्गाच्या सानिध्यात उभारलेल्या प्रजापती म्यॅगनम, द्रोणागिरी उरण येथे दरवर्षी मंगळागौर सण मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. रिद्धी पारीख हिने स्वतःच्या वेळेचे योगदान देऊन उत्कृष्ट पद्धतीने मंगळगौरीचे आयोजन केले होते.लक्ष्मीची अनेक रूपे, सदभावना, एकात्मिकरित्या पूजन, नृत्य -घागर घूमु दे, नाच ग घुमा, झिम्मा, विविध फुगड्या,पिंगा, अशा विवीध पारंपारीक नृत्याचा अविष्कार महिला वर्ग गृहस्थिचे कामकाज आटोपून वेशभूषा, लक्ष्मीच्या रूपातले पवित्र रूप साकारून नृत्याचा अविष्कार साकार केला. अविस्मरणीय असा धार्मिक सण साजरा करून नव्या पिढीला हा वसा देऊन जागृत ठेवला.भारतीय संस्कृतीचे जतन मंगळागौर सणातून होत असल्याचे चित्र उरण मध्ये सर्वत्र पहावयास मिळत आहे.
