
उरण दि १५(विठ्ठल ममताबादे ) आजादी का अमृत महोत्सव आणि हर घर तिरंगा अभियानाच्या पार्श्वभूमीवर तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय, फुंडे येथे एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थिनी कुमारी श्रावणी दशरथ कोळी हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्राचार्य बी.बी. साळुंखे यांनी घेतलेल्या या अभिनव निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत सादर करण्यात आले व देशभक्तिपर गीतांनी वातावरण भारावून गेले.प्राचार्य यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना देशभक्ती, शिस्त आणि परिश्रम यांचे महत्व पटवून दिले.यावेळी उपमुख्याध्यापिका एस. डी.थोरात,शिक्षक वृंद व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते .
