
जळगाव निंबायती (वार्ताहर) – येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गो. य. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सोमनाथ काळे यांनी पूजन केले तर दादा विठ्ठल दुकळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर स्काउट गाइडचे ध्वजारोहण सांस्कृतिक विभाग प्रमुख डी. जे. देवरे यांच्या हस्ते झाले. संस्थेच्या अध्यक्षा कासूताई पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. प्रारंभी विद्यार्थ्यांनी गावातून प्रभातफेरी काढून देशभक्तिपर घोषणा दिल्या. विद्यालयाच्या प्रांगणात सांस्कृतिक कार्यक्रमात क्रीडाशिक्षक ललित निकम यांनी विद्यार्थ्यांकडून राष्ट्रभक्तिपर गीतांवरील सामूहिक कवायतीला व राष्ट्रभक्तीपर गीतांना व भाषणांना उपस्थितांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.

प्रसंगी उपस्थितांकडून आमली पदार्थ विरोधी व जेष्ठ नागरिकांचा सन्मानाची सामूहिक शपथ घेण्यात आली. प्रास्ताविक नरेंद्र अहिरे यांनी केले. सूत्रसंचालन ए. एम. साळुंके यांनी केले. यावेळी पोलीस निरीक्षक अशोक सुर्यवंशी, हवालदार कुमावत, मंडल अधिकारी श्रीमती महाजन तलाठी श्रीमती कुंभकर्ण संस्थेचे सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे, सरपंच वाल्याबाई पटांग्रे, प्राचार्य पी. एन. पवार, पर्यवेक्षक व्ही. डी. काळे यांसह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह बहुसंख्येने विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
