
सिन्नर ( प्रतिनिधी )युगकवी वामनदादा कर्डक यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त युगकवी वामनदादा कर्डक यांच्या देशवंडी ता.सिन्नर जि.नाशिक या मुळ गावी लोककवी वामनदादा कर्डक समग्र वाड़मय भाग 01 ( हिन्दी ) व लोककवी डॉ.वामनदादा कर्डक समग्र वाड़मय भाग 02 ( मराठी ) हे दोन खंड युगकवी डाॅ.वामनदादा कर्डक यांचे कायदेशीर वारसपुत्र व युगकवी वामनदादा कर्डक चॅरिटेबल ट्रस्ट,नाशिक चे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष आयु.रविंद्र वामन कर्डक यांच्या हस्ते दि.14 ऑगस्ट 2025 रोजी प्रकाशन झाले

त्या वेळी सेवानिवृत्त नायब तहसीलदार महामित्र मा.दत्ताभाऊ वायचळे हे कार्यमाचे अध्यक्ष म्हणून होते त्यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलतांना मा.दत्ताभाऊ वायचळे म्हणाले की वामनदादांचा जन्म ज्या गावी झाला त्या गावी कार्यक्रमाप्रसंगी मला ही यायला मिळाले याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो तसेच वामनदादांचे आजं वामनदादांच्या जन्मगांवी वामनदादांच्या दोन्ही पुस्तकांच्या खंडांचे जे अनावरण झाले त्या करता वामनदादांच्या जयंतीनिमित्त व भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आपणा सर्वांना शुभेच्छा ही देतो आणि आपण वामनदादांचा वारसा जतन करुन वामनदादांचे कार्य पुढे न्यायची गरज असून युगकवी डॉ.वामनदादा कर्डक यांचे जे जन्मगाव देशवंडीचे अपुर्णस्थितीत स्मारक आहे त्याबद्दल खंत ही वाटते वामनदादा कर्डक हे खऱ्या अर्थाने राष्ट्रीय महाकवी,राष्ट्रीय कवी होते वामनदादांनी जे कार्य केले ते अभिमानास्पद असून वामनदादांचे हे जन्मगावचे स्मारक आहे तरी त्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची गरज आहे असे वक्तव्य महामित्र व सेवानिवृत्त नायब तहसीलदार मा दत्ताभाऊ वायचळे यांनी केले तसेच कोपरगाव येथील प्रसिद्ध गायिका आरतीताई खरात या ही उपस्थित होत्या त्यावेळी आरतीताईंनी वामनदादांना आदरांजलीपर बोलतांना वामनदादांचे भीमाच्या पायवाटेची जराशी धूळ मी आहे,नदी नाले ओढ्तातील झूळझूळ मी आहे हे गीत सादर केले

तसेच या प्रसंगी देशवंडी गावचे सरपंच नवनाथ बर्के,पोलीस पाटील मुकेश कापडी,सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कर्डक,देविदास कर्डक,भाऊसाहेब कापसे बाळू कापडी दत्ताराम डोमाडे भाऊराव कापडी राजाराम कापडी भाऊसाहेब बरके,माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनिता साळवे,जि.प.प्राथमिक विद्यालयाच्या उपशिक्षिका भीमाबाई बैरागी व समस्त ग्रामस्थ देशवंडी,ता.सिन्नर (नाशिक) आयु.रविंद्र वामन कर्डक ( संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष.युगकवी वामनदादा कर्डक चॅरिटेबल ट्रस्ट,नाशिक ) नाशिक,आयु.ललिता रविंद्र कर्डक ( युगकवी डॉ.वामनदादा कर्डक यांच्या सुनबाई )नाशिक,आयु.वैभव रविंद्र कर्डक ( राष्ट्रीय उपाध्यक्ष.युगकवी वामनदादा कर्डक चॅरिटेबल ट्रस्ट,नाशिक ) नाशिक,आयु.कोमल रविंद्र कर्डक ( राष्ट्रीय सरचिटणीस.युगकवी वामनदादा कर्डक चॅरिटेबल ट्रस्ट, नाशिक ) नाशिक,आयु.शरद दिनकर शेजवळ ( संस्थापक व कार्याध्यक्ष.लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक ) नाशिक,आयु.राजानंद नाथाजी नवतुरे ( राष्ट्रीय सदस्य.युगकवी वामनदादा कर्डक चॅरिटेबल ट्रस्ट,नाशिक ) छत्रपती संभाजीनगर,शाहीर आयु.संभाजी गायकवाड ( राष्ट्रीय सदस्य.युगकवी वामनदादा कर्डक चॅरिटेबल ट्रस्ट,नाशिक ) छत्रपती संभाजीनगर,आयु.रविकिरण गांगुर्डे ( राष्ट्रीय सदस्य. युगकवी वामनदादा कर्डक चॅरिटेबल ट्रस्ट,नाशिक ) नाशिक,ॲड.अनिल निकम,नाशिक,ॲड.विजयभाऊ बागुल नाशिक, ॲड. रामभाऊ वाघ नाशिक, ॲड.कृष्णाभाऊ शिलावट नाशिक,ॲड.तातेराव जाधव नाशिक,ॲड.रविभाऊ कांबळे नाशिक यांची प्रमुख पाहुणे उपस्थिती होती आणि युगकवी डॉ.वामन वामनदादा कर्डक यांच्या हिन्दी आणि मराठी या काव्य खंडाच्या प्रकाशना वेळी युगकवी डॉ.वामनदादा कर्डक यांना जयंतीनिमित्त आदरांजली ही अर्पण करण्यात आली आहे सदर प्रकाशन व आदरांजली चा कार्यक्रमाचे संयोजन तथा आयोजन प्रवीण कर्डक,देविदास कर्डक,व समस्त ग्रामस्थ देशवंडी,ता.सिन्नर नाशिक,व युगकवी वामनदादा कर्डक चॅरिटेबल ट्रस्ट,नाशिक व लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आला होता व आहे आणि यावेळी राज्यातून व राज्या बाहेरुन बरेच युगकवी डॉ.वामनदादा कर्डक यांचे चाहते उपस्थित होते*
