
निगडोळ :-(प्रतिनिधी ) येथील रयत शिक्षण संस्थेचे मा.शरदरावजी पवार माध्य.विद्यालय निगडोळ ता.दिंडोरी जि.नाशिक या विद्यालयाच्या प्रांगणात १५ ऑगस्ट २०२५ रोजी ७९ व्या स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहनाचा सोहळा उत्साहात पार पडला.विद्यालयाच्या स्थानिक सल्लागार समितीचे चेअरमन मा.बबनराव यशवंत मालसाने यांच्या शुभहस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहन झाले.शासन परिपत्रकाप्रमाणे ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेअंतर्गत ७९ व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने पंचक्रोशीत विद्यार्थ्यांच्या घरीही ध्वजउत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.२ऑगस्ट २०२५ पासून तर १४ ऑगस्ट २०२५ दरम्यान विद्यालयात चित्रकला,रांगोळी,क्रीडा स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा इ.स्पर्धा व सामुहिक पसायदान इ.कार्यक्रम राबवण्यात आले.मा.मुख्याध्यापक बोरसे डी.डी.यांच्या मार्गदर्शनानुसार ज्येष्ठ शिक्षक श्री.कापडणीस एन.जे.यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.या नियोजनानुसार परिसरातील जि.प.प्राथ.शाळा,शासकीय आश्रम शाळा व मा.श.प.माध्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सामुहिक कवायतीचे प्रकार सादर केले.तसेच सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले.क्रीडा शिक्षक श्री.वाघमारे ए.बी.यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी सुंदर ड्रील मार्चिंगचे प्रदर्शन केले.या प्रसंगी विद्यालयाच्या विविध समित्यांचे पदाधिकारी,माजी विद्यार्थी व सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,नोकरी व्यवसाय व कृषी क्षेत्रातील शिक्षणप्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक बोरसे डी.डी.यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जेष्ठ शिक्षक एन.जे.कापडणीस यांनी केले तर उपस्थितांचे आभार एस.व्ही.बेद्रे यांनी मानले.पी.व्ही.गायकवाड मॅडम,टी.व्ही.भामरे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अनमोल सहकार्य केले.
