
भालूर(वार्ताहर) येथे देशाचा ७९ वा स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमांसह उत्साहात साजरा करण्यात आला. जि.प.प्राथमिक शाळेत ग्रामपंचायत सदस्या आरती सोनवणे यांना ध्वजारोहणाचा मान मिळाला. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या ध्वजाचे ध्वजारोहण सरपंच शालूबाई थेटे यांनी केले. यावेळी.शिवाजी महाराजांचे पूजन बापू महाराज यांनी तर भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन विठ्ठल सोमासे यांनी केले.तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन तलाठी बालाजी घोडके यांनी केले. त्यानंतर १२ जानेवारीला ज्या नागरिकांनी वृक्ष संवर्धनासाठी जेसीबी आणि ट्रक्टर मोफत दिले त्यांचा यावेळी ग्रामपंचायत च्या वतीने सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.तसेच इयत्ता दहावी आणि बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.यावेळी दिगंबर निकम,विक्रम निकम, गणपत निकम ,पो.पा.अरुणा पवार,माधव निकम,भाऊसाहेब सोमासे, देविदास निकम,राजेश निकम,राजेंद्र मेंगळ ,नवनाथ निकम,अप्पासाहेब मडके,वसंत निकम,अनिल बरशिले,समाधान थेटे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंमली पदार्थ विरोधी शपथ यावेळी मनमाड पोलीस स्टेशनच्या वतीने सहा.पो.नि. मधुकर उंबरे आणि शिवाजी कापडणे यांनी उपस्थित ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ विरोधी शपथ दिली ड्रग्ज मुक्त भारत हा संकल्प यावेळी करण्यात आला.इतरांना प्रेरित करून निरोगी आणि सशक्त भारत घडविण्यासाठी आपला सहभाग वाढवावा असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले.
