
लेखक:-शंकर नामदेव गच्चे जि.प. प्रा.शा.वायवाडी ता.हिमायतनगर जि. नांदेड मोबाईल नंबर-८२७५३९०४१०
बहामनी राज्याचे विभाजन झाल्यावर ज्या सरदारांच्या खांद्यावर विविध शाहया राज्य करीत होत्या. त्यात भोसले व जाधव या घराण्यांचा समावेश होता. मालोजी राजांपासून आपणास भोसले घराण्याचा इतिहास ज्ञात आहे. मालोजीराजे निजामशाहीतील प्रमुख मनसबदारांपैकी एक होते. त्यांना शहाजी व शरीफजी ही मुले होती. शहाजी राजांचे लग्न तत्कालीन कालखंडातील मातब्बर सरदार लखुजी राजे जाधवराव यांची कन्या जिजाबाई यांच्याशी झाला.भातवडीच्या लढाईत पराक्रम गाजविल्यामुळे शहाजीराजांचे नाव सर्वदूर झाले. शहाजीराजे व मातोश्री जिजाबाई यांना एकूण आठ अपत्ये झाली.त्यात सहा कन्या व दोन पुञ रत्न झाली. थोरले संभाजी राजे व स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. संभाजीराजे लढाईत मारले गेले. निजामशाही आदिलशाही मुघल यांच्या संपर्कात आल्यावर शहाजीराजांना स्वतंत्र राज्य स्थापनेचे महत्त्व समजले होते. आजूबाजूची परिस्थिती, काळाचे दडपण काही अन्य मर्यादा यांमुळे शहाजीराजांना स्वराज्य स्थापना करता आली नाही.जिजाऊ व शहाजी राजे यांचे स्वप्न पुत्र शिवाजीं राजानी पूर्ण केले. दिनांक १९ फेब्रुवारी सोळाशे १६३० रोजी जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावर शिवाजीचा जन्म झाला.आदीलशाहाने शहाजीराजांना पुणे व सुपे प्रांताची जहागिरी दिली होती.जहागिरीची व्यवस्था पाहण्यासाठी मातोश्री जिजाबाई त्यांच्यासोबत अष्टप्रधानमंडळ शहाजीराजे भोसले यांनी पुण्याला पाठवले होते.अष्टप्रधान मंडळ ही काही राज्यभिषकाच्यावेळची कल्पना नाही.छञपती शिवाजी महाराजांनी एवढे मोठे स्वराज्य कसे उभे केले याचे सर्वात महत्वाचे कारण आहे की त्यांनी आपल्या कामाची विभागणी केली. बंगळोवरून येतानाच शहाजीराजांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हातात भगवा ध्वज दिलेला आहे. राजमुद्रा दिलेली आहे. सोबत सहाशे मावळे व अष्टप्रधान मंडळ दिलेलं आहे.सहाशे लोकांकडून काम करून घेण्यासाठी अष्टप्रधानमंडळ आहे. म्हणजे कमी महत्वाच काम करण्यासाठी सहाशे लोक आहेत.महत्वाच काम करण्यासाठी अष्टप्रधान आहे.अत्यंत महत्वाच काम करण्यासाठी शिवाजी महाराज आहेत. शहाजी राजांनी शिवाजींच्या शिक्षणाची लष्करी प्रशिक्षणाची व प्रशासनाची उत्तम व्यवस्था केली होती. शिवाजीराजांनी जहागिरीची पुनर्व्यवस्था केली. शेतीला प्राधान्य दिले. निष्पक्षपाती व्यवस्था उभारली.मातोश्री जिजाबाईने आपल्या मुलाच्या मनात दुर्दम्य महत्त्वाकांक्षा निर्माण केली.पुण्याला पश्चिमेला असणार्या बारा खोर्यांचा म्हणजे पर्यायाने बारा मावळांचा त्यांनी बंदोबस्त केला. जहागिर ताब्यात असली तरी जहागिरीतील किल्ले विजापूरकरांच्या ताब्यात होते. त्यामुळे शिवाजी राजांनी जहागिरीतील किल्ल्यांची डागडुजी केली. शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले साम-दाम-दंड-भेद यांचा वापर करून कोंढाणा व पुरंदर किल्ले ताब्यात घेतले. १६४७ नंतर राजांनी मुरुंबदेव उर्फ राजगड घेतला. शिवाजी महाराजांच्या हालचालींनी शंकित झालेल्या आदिलशहाने शहाजीराजांना कैद केले.शहाजीराजे बंगळुरात राहत. एकीकडे शिवाजी व संभाजींचे स्वराज्य स्थापनेचे उद्योग चालू होते,तर दुसरीकडे कर्नाटकातील शहांजी राजांच्या मोहीमाही यशस्वी होत होत्या.दोन वर्षापासून सतत एक एक मोहीम फत्ते करीत शिवाजी राजे यशोशिखरावर पोहचत होते.बाप लेकांच्या यशस्वी कामगिरीने विजापूर दरबारातील काही सरदार अस्वस्थ होते.त्यांनी शहाजीराजांच्या विरोधात चुगलीखोरीची मोहीम उघडली.शहाजी कर्नाटकातील हिदू राजांना मदत करतो व त्यांचा पूर्ण नाश होऊ देत नाही हे व यासारखे आरोप लाऊन जिंजीच्या वेढ्याच्या वेळी मुस्तफाखानने शहाजी राजांना मध्ये राञी अटक केली.शहाजी राजांचा सर्व ऐवज जप्त करुन त्यांना बेड्या ठोकून अफजलखानाने त्यांची अपप्रतिष्ठा करीत विजापूरच्या बादशाहाच्या हवाली केले.या अटकेला आणखी एक प्रभावी कारण होते “मला तुमच्या आश्रयाला घ्या”.या आशयाचे एक पञ शहाजीराजांनी गोवळ कोंड्याच्या कुतुबशाहस लिहिले होते.त्यामुळे शहाजींच्या निष्ठेविषयी आदिलशाहाला संशय आला होता.शहाजींच्या दोन्ही पुञांच्या कारवायांनाही आवर घालण्याचा आदिलशाहाचा हेतू होता.त्यासाठी त्यांनी बंगलोरला संभाजीराजांना जिंकण्यासाठी फरीदखान व शिवाजी राजांना जिंकण्यासाठी फत्तेखान यांना पाठवले पण या दोघांचाही दारुण पराभव झाला.त्यामुळे नाईलाजाने आदिलशाहने काही अटीवर शहाजी राजांना सोडण्याचे ठरवले.बंगळूर व कंदर्पी हे दोन कील्ले संभाजीने व कोंढाणा हा कील्ला शिवाजीने विजापूरकरांना परत द्यावा म्हणजे शहाजी राजांची सुटका करु असे ठरले.संभाजी राजांने आपल्या अचाट पराक्रमाने मिळवलेले बंगळूर व कंदर्पी हे दोन्ही कील्ले आदिलशाहाच्या स्वाधीन केले.पण शिवाजी राजे माञ कोंढाणा किल्ला देण्यास तयार नव्हते.एकीकडे महत्त्वाकांक्षी पुञांच्या स्वप्नांची धुळदाण तर दुसरीकडे सौभाग्याचे लेणे पुसले पुसले जाण्याची जीवाचा थरकाप उडवणारी भयकंपित स्थिती,अशा कोंडीत जिजाऊ सापडल्या.त्यांनी अशा अवस्थेत शिवबाशी वादही घातला.जिजाऊंसोबत शहाजी राजांनी पाठवलेला मुरब्बी मार्गदर्शक सोनोपंत डबीर यांनी माय-लेकातील भावनिक ताण नाहीसा करीत युक्तिवाद केला,ते म्हणाले,”आदिलशाहाला दिलेला कील्ला उद्या पुन्हा आपल्या पराक्रमाने घेता येईल,पण आपल्या पित्याच्या जीवास काही धोका झाल्यास होणारे नुकसान भरुन निघणार नाही “.शिवबांना क्षणात संभाव्य परिस्थितीचा अंदाज आला. आणि त्यांनी कोंढाणा देऊन वडीलांची सुटका करून घेतली. या घटनाक्रमांनंतर जहागिरीची व्यवस्था राखण्याकडे शिवजीराजांनी लक्ष दिले बाबाजी भिकाजी गुजर याने बदअंमल केला म्हणून राजांनी त्याचे हातपाय तोडण्याची शिक्षा दिली. १६४६ च्या सुमारास राजमुद्रा पत्रांवर उमटू लागली प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते!!
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसूनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते. या राजमुदेत ३condition आहेत प्रतिपच्चंद्रलेखेव हे शहाजी च्या मुला शिवाजी तुला प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे स्वराज्याची सुरुवात करायची आहे.प्रतिपदेचा चंद्र केवढा असतो.अमावस्याझाल्यानंतर दुसऱ्या दिवशी उगवणारा चंद्र म्हणजे प्रतिपदेचा चन्द्र होय तुला स्वराज्याची सुरुवात करताना तुझ्याकडे भांडवल खूप कमी असेल, खूप कमी मनुष्यबळ,खूप कमी पैसा खूप कमी साधनसंपत्ती म्हणजेच शून्यातून तुला हे राज्य उभ करायचय. कंडीशन नंबर-२ पण कसं असला पाहिजे हे राज्य हे राज्य शून्यातून निर्माण करायचं असलं तरी ते विश्वात वंदनीय असल पाहिजे ते छोट असता कामा नये ते पुणे यापुरत मर्यादित असता कामा नये, विदर्भ-मराठवाडा पुरता मर्यादित असता कामा नये,महाराष्ट्रापुरत मर्यादित असता कामा नये भारतापुरत मर्यादित असता कामा नये, आशिया खंडापुरत मर्यादित असता कामा नये या गोष्टीचा अर्थ आम्हाला कळला नाही.आम्ही शिवाजी महाराजांना ऐवढ लहान केल आम्ही म्हणतो महाराष्ट्राचे कुलदैवत छञपती शिवाजी महाराज. त्यांच्या आई वडिलांचं स्वप्न केवढं आणि आम्ही त्यांना केवढ केलं.विश्ववंदीता म्हणजे काय? भारतासारखे अनेक देश मिळून एक खंड तयार होतो. असे सात खंड मिळवून पृथ्वी तयार होते. अशा अनेक पृथ्वी मिळून एक आकाशगंगा अशा अनेक आकाशगंगा मिळवून विश्व तयार होते.आणि आम्ही त्याना महाराष्ट्रापुरत मर्यादित करतो.त्याच्याही पुढे जाऊन मराठ्यांचे शिवाजी महाराज, जाधवांचे शिवाजी महाराज, भोसल्यांचे शिवाजी महाराज, आम्ही देशमुख आम्ही शहाण्णव कुळी पाटील आणि सोयरी अमुक मध्येच करणार आणि शिवाजी महाराजांचा रथ कोण पुढे नेणार? हा गाडा पुढे कोण नेणार? नाही ते काम आमचं नाही मग देशमुख, पाटील म्हणू नका स्वतःला गप्प घरी बसा. शिवाजी महाराजांच्या भांडवलाचा उपयोग करून घ्यायचा पण शिवाजी महाराजांच्या चरित्राला पूरक असं वागायचं नाही.
कंडीशन नंबर-३ मुद्रा भद्राय राजते जरी तू विश्ववंदनीय राज्य उभं केलंस तरी ते राज्य भोसल्यांचे, निंबाळकरांच, पवारांचं, जाधवांचं असणार नाही तर ते राज्य रयतेचे असेल. सर्वसामान्यांच्या मालकीचं राज्य असेल आणि शिवाजी महाराजांनी आयुष्यभर ही अट पाळली ४२२किल्ल्यांपैकी एकाही कील्यावर मालकी सांगितली नाही. आणि आज आमचे नेते टॉयलेटच्या उद्घाटनाला मारामाऱ्या करतात. नेते कोणाला म्हणतात माहित आहे जे समाजाच्या नावावर येत ते आपल्या घरी नेते.
आदिलशाही दरबारातील अशांत अस्थिर वातावरणाचा फायदा घेऊन शिवाजींनी जावळीचे खोरे चंद्रराव मोर्याच्या ताब्यातून जिंकून घेतले व कोकणावरील प्रभुत्वाचा मार्ग खुला केला. प्रतापगड बांधवून घेतला. सुपे जिंकले. रोहिडा किल्ला जिंकला. त्यानंतर कल्याणचा खजिना लुटला.रायरीच्या डोंगरावर रायगड बांधवून घेतला.१६५७ च्या सुमारास शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी जिंकले.व तेथे जहाज बांधणीचे काम सुरु करुन मराठ्यांच्या आरमाराची सुरूवात केली. उत्तर व दक्षिण कोकणावर प्रभुत्व मिळविण्याच्या दृष्टीने शिवाजींच्या हालचाली चालू असतानाच आदिलशाहाने अफझलखानाची नेमणूक शिवाजींविरुद्ध केली. अफजलखान हा त्या काळातील एक पाताळयंत्री, शक्तिमान युद्धनिपुण सरदार होता. अफजलखानाने शिवाजी विरुद्ध आक्रमण करताना पंढरपूर तुळजापूर या धार्मिक क्षेत्रांची हानी केली. शिवाजीराजे त्याला बधले नाहीत.युक्तीने त्याला प्रतापगडाखाली बोलावून राजांनी दिनांक १० नोव्हेंबर १६५९ रोजी त्याला ठार मारले. खानाच्या मृत्यूचा विलक्षण धक्का आदिलशहाला बसला. तर शिवाजीराजांचे नाव भारतभर पसरले. अदिलशहाचा दुसरा सरदार सिद्दी जौहर याने राजांस पन्हाळ्यात कोंडीत पकडले. राजांनी विशाळगडावर युक्तीने पलायन केले. राजास विशाळगडावर सुखरूप पोहोचले बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले. शिवाजीराजे व मुघल यांच्यातील संघर्ष शिवाजीराजे व मुघल संघर्षातील महत्त्वाची घटना म्हणजे शाहिस्तेखान प्रकरण औरंगजेबाने आपला मामा शाहिस्तेखान यास शिवाजींविरुद्ध पाठविले. खानाने पुणे येथील लाल महालात मुक्काम केला. राजांनी जिवाची बाजी लावून लाल महालात निवडक सैन्यानिशी प्रवेश करून खानावर हल्ला चढविला. त्याची बोटे कापली व अक्षरश अंतर्धान पावले. शाहिस्तेखान स्वारीत स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राजांनी औरंगजेबाची आर्थिक राजधानी सुरत शहर लुटले. तेथील परकीय व्यापार्यांना लुटले.एतद्देशीयांचे धन लुटणार्या व्यापार्यांस जरब बसविली. याचा प्रतिशोध घेण्यासाठी औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग या अजेय सेनापतीस पाठविले. मिर्झा राजे व दिलेरखानाने मराठ्यांचा पराभव करून शिवाजींस शरण आणले. मिर्झाने २३किल्ले व ४ लाख उत्पन्नाचा प्रदेश शिवरायांना मागितला.व राजांना आगरा येथे औरंगजेबाच्या भेटीस बोलावले.आगरा येथे पोहोचल्यावर औरंगजेबाने राजांस नजरकैदेत टाकून ठार मारण्याचा बेत आखला. परंतु शिवाजीराजे पुत्र संभाजींसह सुटका करून घेण्यात यशस्वी ठरले. ही सुटका जागतिक इतिहासातील एक आश्चर्यजनक घटना मानली जाते. औरंगजेबाला विलक्षण धक्का बसला. स्वराज्यात परतताच राजांनी मुघलांना तहात दिलेले किल्ले परत जिंकून घेण्याचा सपाटा लावला. कोंढाणा किल्ला जिंकताना तानाजी मालुसरे यांस वीरमरण आले. परंतु किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. १६७०मध्ये राजांनी पुन्हा एकदा सुरतेवर स्वारी करून अमाप द्रव्य स्वराज्यात आणले. यानंतर मध्ययुगाच्या इतिहासातील आणखी एक अभूतपूर्व घटना घडली. ती म्हणजे दिनांक ६-जून १६७४रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. या सोहळ्यास काशीचे पंडित गागाभट्ट उपस्थित होते.यामुळे राजे छत्रपती झाले. या निमित्ताने त्यांनी तांब्याचा पैसा शिवराई आणि सोन्याचा शिवराई होन अशी खास नाणी सुरू केली.एक शुद्र मराठा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही.भारताच्या इतिहासातील ही अद्वितीय घटना होती.त्यामुळेच त्यांच्यावर अनेक वेळा विषप्रयोगही झाला.शिवरायांनी रघुनाथ पंडित आणि धुंडिराज लक्ष्मण व्यास यांना राज्यव्यवहार कोश सिद्ध करण्यास सांगितले.भाषेतील फार्सी शब्दांच्या ऐवजी पर्यायी शब्द देण्याची किंवा स्वभाषीय वळण देण्याची छत्रपती योजना मध्ययुगात नक्कीच अनुकरणीय होती.पंचांग सुधारणेसाठी कृष्णज्योतिषीकडून करणकौस्तुभ हा नवा ग्रंथ सिध्द केला. राज्यरोहणाच्या घटके पासून फसली शक बदलून नवा राजशक सुरू करण्यात आला. राज्याभिषेकाचा सोहळा पाहून तृप्त झालेल्या मातोश्री जिजाऊसाहेबांचे निधन राज्यभिषेकानंतर बारा दिवसांनी झाले. यानंतर महाराजांनी औरंगजेबाचा धोका ओळखून दक्षिणेत राज्यविस्तार केला.भागानगरला जाऊन कुतुबशाहाची भेट घेतली.त्याच्याशी मैञीचे संबंध प्रस्थापित केले. अशा या महान राजाचा मृत्यू ३-एप्रिल १६८० रोजी वयाच्या ५० व्या वर्षी झाला.
त्यांच्या कार्य कर्तृत्वास कोटी कोटी प्रणाम
