
नांदगाव( वार्ताहार) नांदगाव येथील वैजनाथ जिजाजी (व्हि.जे.) विद्यालयात ७९ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत मान्यवरांच्या शुभहस्ते ध्वजारोहन होऊन उपस्थित सर्वांतर्फे तिरंगा ध्वजाला सलामी देण्यात आली.ह्यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या जोशासह तालासुरात म्हटलेल्या राष्ट्रगीत, ध्वजगीत आणि महाराष्ट्र राज्यगीताने शाळेतील एकूणच वातावरण देशभक्तीमय झाले नसते तर नवलंच ..! त्याआधी उपमुख्याध्यापक मान.श्री.डाॕ. जोगेश्वर नांदुरकर ह्यांनी शहीद स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ स्वतः रचलेले ‘नम्र वंदना~~..,’ हे गीत सादर केले.*

विद्यार्थ्यांनी ध्वज प्रतिज्ञा तसेच भारताचे संविधान म्हणजेच उद्देशिका म्हणत संकल्पपूर्वक निर्धाराचे स्मरणही केले.शिक्षक प्रतिनिधी श्री.सुरेश नवसारे, श्री.प्रविण अहिरे ह्यांनी अनुक्रमे ध्वजप्रतिज्ञा तसेच उद्देशिकेचे अनुवाचन केले.ह्यावेळी व्यासपीठावर माजी विद्यार्थी भारतीय सैन्यदलात बारमेर (राजस्थान) येथे सेवेत असलेले नांदगावचे भूमीपूञ.श्री. मयुरजी शिंदे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

जम्मू काश्मिर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी तेथून जवळच कार्यरत असलेले श्री. मयुर शिंदे ह्यांनी काही महीन्यांपूर्वी झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धातही प्रत्यक्षदर्शी अनुभव घेतला आहे. शाळेच्या दृष्टीने ही अभिमानास्पद गोष्ट आहे…, हे विशेष…!!*तथा संस्था सदस्य (Fellow) मा.श्री.मंदार रत्नपारखी, पा.शि.संघ उपाध्यक्ष सौ. पूनम लोहाडे,श्री.बाळासाहेब सरोदे, पा.शि.संघ सदस्य मान. श्री.अनिल थोरे आदी मान्यवर उपस्थित होते त्यांचे हस्ते भारतमातेचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापक मान.श्री. लक्ष्मीकांत ठाकरे ह्यांनी आपल्या संदेशातून भारत देशाने केलेल्या सर्व क्षेञांतील सर्वंकष प्रगतीला सर्वांसमोर उजाळा देतांना जेव्हा प्रत्येक नागरीक सुशिक्षित, सुरक्षित होऊन सन्मानाने जगेल..; तेव्हाच खरी स्वातंत्र्याची जाणीव होईल..!

असे प्रतिपादन केले.असंख्य क्रांतीकारकांच्या बलिदानामूळे आज शाळेच्या मैदानावर आपण स्वातंञ्याचा ध्वज फडकवित आहोत..; म्हणून आपल्या स्वातंत्र्याची कहानी केवळ इतिहासाच्या पानांवरच नाही तर प्रत्येकाने ती आपल्या हृदयातही जपली पाहीजे..; किंबहुना आपल्याला आता जबाबदारीचे स्वातंत्र्य शिकायचे असून भ्रष्टाचार,भेदभाव,अंधश्रद्धा तथा हिंसा आदींना नाकारून एकतेचा आणि विकासाचा मार्ग आपण स्विकारायचा आहे..; असेही सांगितले. “आज शिकलेली प्रत्येक गोष्ट ऊद्याच्या भारताचे पायाभूत दगड ठरणार आहे..! हा देश केवळ आपलाच नाही तर भावी पिढ्यांचाही आहे..!” असे सांगत सर्वांना शिस्त, प्रामाणिकपणा, तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि पर्यावरणाचे रक्षण आदी बाबी आत्मसात करण्याचे आवाहनही त्यांनी आपल्या प्रास्ताविकांतून केले.

विद्यार्थीनींसह मुलांच्या एन.सी.सी.पथकाने श्री. राजेश भामरे ह्यांच्या मैदानावर एन.सी.सी. गणवेशातील केलेले संचलन म्हणजे जणू शिस्तबद्ध तथा एकसमान, लयबद्ध पदललित्याचा आकर्षक नमूनाच होता.., असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. *भारत माता की जय..! वंदे मातरम…! आदी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त घोषणांमुळे वातावरण देशभक्तीमय होण्यासह परीसर जोशपूर्ण निनादाने गजबजून गेला होता..,स्वातंत्र्य दिनानिमित्त ना.शि.प्र. संस्थेचे ञैमासिक ‘ज्ञानयाञी’ अंकाचे प्रकाशन करण्यात आले. श्री.प्रविण अहिरे ह्यांनी प्रकाशन सोहळ्याचे संचलन केले.*अंकात साहीत्य प्रकाशित झालेल्या कु. गिरीजा वाणी (इ. ६ अ), कु. श्रद्धा बोढरे (इ. ७ ब) ह्या विद्यार्थीनींसह शिक्षीका श्रीम.निवेदिता सांगळे ह्यांचेही पुष्प देऊन कौतुक करण्यात आले. संस्थेतर्फे खास दिल्या जाणाऱ्या ट्राॕफीजचे वितरण शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना करण्यात आले. शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी अनुक्रमे कु. सोहम गायकवाड, कु. स्पंदन कांगणे, कु.सर्वज्ञ पांडे यांना ट्राफीजचे वितरण करण्यात आले श्री.अनिल तांबेकर ह्यांनी ट्राॕफीज् वितरणासाठी संचलन केले. उपस्थितांसमोर क्रीडाशिक्षक श्री. खंडू चौधरी श्रीम. सूनिता देवरे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी-विद्यार्थीनींनी नेञदिपक हालचालींसह सुरेख कवायत प्रकारांचे प्रभावी सादरीकरणही केले. श्री. सुदेश नरसकर ह्यांनी सर्व उपस्थितांसह विद्यार्थ्यांसाठी ह्यावेळी ‘अंमली पदार्थ मुक्त भारत’ प्रतिज्ञेचे अनुवाचन केले.सूञसंचलन करत उपस्थितांचे आभार श्रीम. सूनिता देवरे ह्यांनी मानले. शेवटी शाळेतर्फे सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. शाळेतर्फे कार्यक्रमाला उपमुख्याध्यापक.श्री. डाॕ. जोगेश्वर नांदुरकर, टि.एम.बोर्ड सदस्य श्री.भास्कर मधे, श्री. गुलाब पाटील, सौ. रूपाली झोडगेकर शिक्षक प्रतिनीधी श्री. प्रविण अहिरे, श्री. सुरेश नवसारे शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थीनी, शहरातील पालक, माजी विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.*
