
पिंपळगाव बसवंत प्रतिनिधी :- मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कर्मवीर गणपत दादा मोरे जनता विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर मा. श्री विश्वासराव मोरे उपाध्यक्ष मविप्र समाज नाशिक, शुभेदार मा. श्री रावसाहेब जगताप जुनिअर कमांडिंग ऑफिसर, मा. श्री प्रदीप देशमुख साहेब उपनिरीक्षक पिंपळगाव ब पोलिस स्टेशन, स्कूल कमिटी अध्यक्ष श्री जयराम मोरे, श्री उल्हास मोरे व सर्व सदस्य ,व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, माजी विध्यार्थी संघ अध्यक्ष व सर्व सदस्य, विद्यार्थी सुरक्षा समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, शाळेचे मा.मुख्याध्यापक श्री.संजय डेर्ले सर, मुख्याध्यापिका श्रीम शिल्पा धारराव, जेष्ठ शिक्षिका श्रीम डंबाळे एस.जे व ग्रामस्थ उपस्थित होते. *म.वि.प्र संस्थेचे उपाध्यक्ष मा श्री विश्वासराव मोरे साहेब यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.*

*शुभेदार मा. श्री रावसाहेब जगताप जुनिअर कमांडिंग ऑफिसर यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले* तसेच *स्काऊट गाईड ध्वजाचे ध्वजारोहन स्कूल कमिटी अध्यक्ष श्री जयराम मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.* याप्रसंगी शालेय गीत मंचाने राष्ट्रगीत ,राज्य गीत व ध्वजगीत सादर केले. आजच्या स्वातंत्र दिनाच्या कार्यक्रमात कर्मवीर गणपत दादा मोरे जनता विद्यालय, अभिनव बालविकास मंदिर, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल या *तीनही ज्ञान संकुलाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर आधारित कवायत संचालन केले.* या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन विद्यालयातील क्रीडा शिक्षक श्री. संदीप गडाख, श्री अमोल पवार, श्रीम उगले मॅडम यांनी केले.या कार्यक्रमाप्रसंगी भारत सरकारचा तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदयाची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरिता आज दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून *तंबाखू मुक्तीची शपथ मा.श्री प्रदीप देशमुख साहेब उपनिरीक्षक पिंपळगाव ब यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.* यानंतर *सांस्कृतिक कार्यक्रमात देशभक्तीपर नृत्य तसेच गीत, सादर करण्यात आले.* व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ, ग्रंथ भेट देऊन विद्यालय परिवारातर्फे स्वागत करण्यात आले.शाळेचे मा. मुख्याध्यापक श्री .एस एन डेर्ले सर यांनी उपस्थित सर्व ग्रामस्थ ,आजी-माजी विद्यार्थी सर्व पालक, शिक्षक,बंधू व भगिनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समिती व क्रीडा समिती यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एस एन डेर्ले, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले .फोटो ओळ — पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर गणपत दादा मोरे जनता विद्यालयात 79वा स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहन करून सलामी देतांना मा.श्री विश्वासराव मोरे साहेब, उपनिरीक्षक मा श्री प्रदीप देशमुख, शुभेदार मा श्री रावसाहेब जगताप समवेत उपस्थित मान्यवर.
