
उरण दि १५(विठ्ठल ममताबादे ) रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर महाविद्यालय फुंडे आरोग्य समिती व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक अवयवदान’ सप्ताहाच्या निमित्ताने कार्यशाळा आयोजित करण्यात आली.डॉ.कविता भगत,वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोली यांनी व्यक्तीने अंगदान/ अवयवदान का केले पाहिजे याविषयी अत्यंत महत्वाची व उपयुक्त माहिती विद्यार्थ्यांना दिली.त्यांनी आपल्या व्याख्यानातून व्यक्तीच्या शरीरात असणारे अवयव आणि मृत्यूनंतर त्यांचे दान कसे केले जाते,तसेच मृत्यूपूर्वी आपण आपले कोणकोणते अवयव दान करू शकतो.भारतासारख्या खूप लोकसंख्या असणाऱ्या देशात शस्त्रक्रिया दरम्यान अपघाता दरम्यान बऱ्याच व्यक्तिंना वेगवेगळ्या अवयवांची आवश्यकता असते,अशा वेळी अवयव दात्यांनी दान केलेले अवयव त्या व्यक्तीचा जीव वाचवू शकतात.

जगामध्ये १३ ऑगस्ट हा दिवस जागतिक अंगदान/अवयवदान म्हणून साजरा केला जातो,तसेच १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या पंधरवड्यात अवयवदान याविषयी जनजागृती मोहीम राबविण्यात येते.भारतात मात्र डॉ.वेणूगोपाल राव यांनी दिल्ली येथील AIMS रुग्णालयात ३ ऑगस्ट रोजी पहिली अवयव रोपण शस्त्रक्रिया केली,तेव्हापासून भारतात अवयवदान अथवा अवयवरोपन दिन म्हणून साजरा केला जातो.व्यक्तीच्या शरीरातील सर्वच अवयव दान करता येतात अगदी त्वचा सुद्धा दान करता येते.असे सांगितले.डॉ.राजेंद्र इटकरे तालुका आरोग्य अधिकारी उरण यांनी आपल्या व्याख्यानातून अंगदान अथवा अवयवदान याविषयी समाजात असणारे समज-गैरसमज यावर प्रकाश टाकला.व्यक्तीने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की माझ्या मृत्यूनंतर माझे अवयव कोणाच्या तरी उपयोगी पडले पाहिजेत,आणि म्हणतात ना ‘मरावे परी कीर्ती रुपी उरावे’ ‘तसेच मरावे परी अवयवदान रुपी उरावे’ असेही म्हणता येईल.देशातील अवयव साठी गरजूंची संख्याखूप मोठी आहे व अवयव दाते खूप कमी आहेत.त्यामुळे विद्यार्थांनी समाजामध्ये अवयवदानासाठी जनजागृती करावी असे सूचित केले.संतोष परदेशी तालुका आरोग्य पर्यवेक्षक यांनी आरोग्य प्रतिज्ञा वाचली.डॉ.आमोद ठक्कर प्रभारी प्राचार्य यांनी आपल्या मनोगतातून अवयवदान करणे किती महत्त्वाचे आहे याविषयी चर्चा केली.विद्यार्थ्यांनी समाजात अंगदान/अवयवदान याविषयी जनजागृती केले पाहिजे असे त्यांनी सांगितले.आपल्या मनोगतातून त्यांनी रक्तशय या आजाराचे रुग्ण जैन,गुजराती अशा समाजात प्रमाण जास्त होते,आता ते आगरी समाजात सुद्धा वाढले आहे,कारण आहारात विहारात झालेला बदल त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे असे मार्गदर्शन प्रभारी प्राचार्य आमोद ठक्कर यांनी केले.कार्यशाळेचे आभार प्रो.डॉ.अनिल पालवे यांनी मानले,डॉ.श्रेया पाटील यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी पूजा पाटील समुदाय आरोग्य अधिकारी, शरद घाटगे आरोग्य सहायक,सुनील म्हात्रे तालुका आरोग्य सेवक,प्रा.राम गोसावी,प्रा.गजानन चव्हाण,प्रा.प्रांजल भोईर तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे,राष्ट्रीय छात्र सेनेचे स्वयंसेवक व विद्यार्थी उपस्थित होते.
