
नांदगाव! (मुक्ताराम बागुल) :- नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आणि माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज तर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.स्वातंत्र्य दिनानिमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील तिरंगा ध्वजाचे ध्वज पूजन रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत उपसरपंच सौ सुनंदाताई मुक्ताराम बागुल व शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्ष प्राजक्ता आजिनाथ गायके यांच्या हस्ते करण्यात आले तर सरपंच ठकुबाई देविदास पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज रोहिले बुद्रुक येथील तिरंगा ध्वजाचे ध्वज पूजन रोहिले बुद्पूजनग्रामपंचायतच्या सरपंच ठकुबाई देविदास पवार उपसरपंच सौ सुनंदाताई मुक्ताराम बागुल यांच्या हस्ते करण्यात आले.

तर तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका जे. एस. जाधव यांच्या हस्ते करण्यात आले स्वातंत्र्य दिनानिमित्ताने रोहिले बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आणि माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांची प्रथम संपूर्ण गावात प्रभात फेरी काढण्यात आली. येथे असलेल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली व राष्ट्रगीत सादर करण्यात आले. यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत असलेल्या तिरंगा ध्वजाचे प्रथम ध्वज पूजन रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतच्या उपसरपंच सौ. सुनंदाताई मुक्ताराम बागुल व शालेय समितीचे अध्यक्ष प्राजक्ता गायके यांच्या हस्ते करण्यात आले.

तर ध्वजारोहण ग्रामपंचायतीच्या सरपंच ठकुबाई देविदास पवार यांच्या हस्ते करण्यात आले. सलामी देऊन विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत म्हटले. तसेच येथील माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे देखील तिरंगा ध्वजाचे ध्वज पूजन रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच ठकुबाई देविदास पवार व उपसरपंच सौ सुनंदाताई मुक्ताराम बागुल यांच्या हस्ते करण्यात आले. तर ध्वजारोहण विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जे एस जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. स्वातंत्र्य दिनानिमित्ताने माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची कवायत घेऊन सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. जे.एस. जाधव म्याडम या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच ठकुबाई देविदास पवार उपसरपंच सौ सुनंदाताई मुक्ताराम बागुल या उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे सहशिक्षक बी.एस. सोनवणे सर यांनी केले. तर विद्यालयाचे जे.डी. जाधव सर यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी रोहिले बुद्रुक गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, नागरिक व विविध बचत गटांचे पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
