
आंबेबहुला (प्रतिनिधी ) ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन आंबेबहुला येथे क्रांतिकारक महापुरुषांना आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद व समाज बांधवांच्या वतीने अभिवादन करून उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात गावचे सरपंच व जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते क्रांतिकारक महापुरूषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

९ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा आंबेबहुला या गावात प्रथमच साजरा करण्यात आला.गावचे सरपंच सुमन ताई देशमुख यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवांना शुभेच्छा दिल्या.सरपंच सुमन ताई देशमुख यांचा मुलगा प्रशांत देशमुख हे ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त म्हणाले की,९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा आदिवासींच्या हक्क अधिकाराचा सन्मानाचा दिवस आहे.आणि त्यांच्या या उत्सवात सर्व समाजातील बांधवांनी सहभागी झाले पाहिजे असे म्हणत त्यांनी आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा

दिल्या.आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड चे संस्थापक रामु इदे यांनी सांगितले की, आदिवासी हा निसर्ग पुजक आहे निसर्गाला आपला देव मानणारा आहे.आदिवासींमुळेच जल जमीन जंगल टिकून आहे.ते वाचविण्यासाठी अनेक आदिवासी क्रांतिकारक महापुरूषांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं आहे.परंतु, विकासाच्या नावाखाली भरमसाट जंगलतोड केली जात आहे त्यामुळे आदिवासी विस्थापित होत आहे वाढत्या औद्योगिकीकरणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे.त्यामुळे सर्वांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.पर्यावरण वाचवायचे असेल तर आदिवासी माणूस वाचला पाहिजे कारण आदिवासींमुळेच जल जमीन जंगल टिकून आहे परिणामी पर्यावरण टिकून आहे.त्यामुळे त्याची संस्कृती,बोलिभाषा, रूढी परंपरा, हक्क ,अधिकार टिकावे, त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने ( युनो)२३ डिसेंबर १९९४ ला आपल्या आमसभेत ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचा ठराव क्र.४९/२१४ मंजूर करून खऱ्या अर्थाने जगभरातील आदिवासींना आपल्या हक्काचा सन्मानाचा दिवस घोषित केला.तेव्हापासून जगभरात ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन साजरा होऊ लागला आहे.व तो शहराबरोबरच खेडोपाडी साजरा झाला पाहिजे असे ते म्हणाले.गावचे जेष्ठ नागरिक विठ्ठल बर्वे यांनी आदिवासी बांधवांना शुभेच्छा देत सांगितले की आदिवासींनी एकजूट होऊन आपल्या हक्क अधिकारासाठी आपण लढलं पाहिजे.हि शिकवण आपल्या क्रांतिकारक महापुरूषांची आहे.ती जोपासली पाहिजे.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आदिवासी गीतांवर नृत्य सादर करत कार्यक्रमाची शोभा वाढवली.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाबूराव पेढेकर, अशोक लोहरे, दामोदर पेढेकर, आकाश गवारी, सचिन कुंदे, योगेश गवारी,आदिंनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामु इदे प्रास्ताविक ज्ञानेश्वर गवारी आभार अशोक लोहरे यांनी मानले.
यावेळी सरपंच सुमन ताई देशमुख, जेष्ठ नागरिक विठ्ठल बर्वे, आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड चे संस्थापक रामु इदे, ज्ञानेश्वर गवारी, प्रशांत देशमुख,शबू गवारी,चिमा गवारी,शिवा गवारी,पिंटू गरकाडी,भोराबाई पेढेकर,हिरा इदे,भारती मांडवे,लंकाबाई गवारी,मिरा पेढेकर,सुमन खोकले, बाबुराव पेढेकर, अशोक लोहरे, दामोदर पेढेकर, आकाश गवारी, सचिन कुंदे, रोशन इदे,प्रशांत ढवळे, अक्षय घोडे,शिवम गवारी,योगेश कोरडे, अमोल जाधव, संतोष गवारी,सूरज ढगे, विकास शेणे,समीर गवारी, गणेश बांगर,अक्षय कुंदे, लक्ष्मण पेढेकर, सचिन पेढेकर, आकाश बांगर,अक्षय जाधव,रवी लोहरे,अजय सुपे,अमित गवारी, सतीश लोहरे, राहुल सुपे,आदि.मोठ्या संख्येने उपस्थित होते.
