
.उरण दि १०(विठ्ठल ममताबादे )कै गो.ना.आक्षीकर विद्या संकुलातील जी.ई.आएस इंग्लिश मीडियम स्कूल उरण प्री प्रायमरी आणि प्रायमरी यांच्यातर्फे शाळेमध्ये रक्षाबंधन साजरा करण्यात आला. CISF प्रमुख मंगेश कांबळे व CISF जवान यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा झाला.शालेय समिती तसेच संचालक मंडळ सदस्य दादर महेश म्हात्रे व शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक वैशाली गावंड, मिनाक्षी पोखरकर,करीना पाटील, श्रीमती. माधवी घरत,शिक्षकेतर कर्मचारी निलीमा थळी, विद्यार्थीनी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सादर झाला. या सर्व जण या कार्यक्रमासाठी उत्साहाने सहभागी झाले.
