
मनमाड ( प्रतिनिधी ) आमदार सुहासआण्णा कांदे यांच्या पाठपुराव्यामुळे मनमाड शहरातील आय.यु.डी.पी.व झोपडपट्टी धारकांना हक्काचे घर मिळवण्याच्या प्रक्रियेला चालना मिळाली असून मनमाड नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना सर्वांसाठी घरे-२०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे नियमाकुल करणे यानिमित्ताने ब सत्ताप्रकार/भोगवटदार वर्ग २ मिळकती धारकांच्या मिळकती नियमित करण्याच्या अनुषंगाने मनमाड शहरात भव्य तीन दिवसीय शिबिराचे आयोजनास सुरुवात करण्यात आली

पहिल्या दिवशी चे शिबिर साई प्रसन्न मंगल कार्यालय चांदवड रोड येथे आज संपन्न झाले. या शुभकार्याच्या उपस्थित महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवत शुभारंभ करण्यात आला. यावेळी मंचावरून मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी साहेब यांनी लाभार्थ्यांना सर्व प्रक्रियेची माहिती दिली. तर महायुतीचे सर्व पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.

आजच्या शिबिरामध्ये आयोडीपी तसेच अतिक्रमित झोपडपट्ट्या मधील नागरिकांनी उपस्थित राहून संबंधित कागदपत्रांची पूर्तता करत अर्ज भरून दिल्या. यावेळी नगरपालिका प्रशासनाचे सर्व अधिकारी वर्ग उपस्थित होता.
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अतिक्रमित घरे आता नावावर होणार असल्याकारणाने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत होते.

यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांचे आभार मानले व आम्हाला कधी वाटले नव्हते की आमची जागा आमच्या नावावर होईल पण ते अण्णांमुळे शक्य झाले अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

येणाऱ्या काळात सर्व भूखंड धारकांचे भूखंड नावावर झाल्यानंतर त्यांना हक्काचे घर मिळणार असून त्यांच्या कागदपत्रं संबंधित सर्व अडचणी दूर होणार आहेत.
