
डॉ. गोराणे अंधश्रद्धा निर्मूलन समिती सरचिटणीस: पुणे येथील पिडीत महिला, मुलींना न्याय मिळावा म्हणून मा.मुख्यमंत्री यांना मा.निवासी उपजिल्हा अधिकारी रोहितकुमार राजपूत यांच्या मार्फत निवेदन देताना महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. आशा लांडगे, राज्य सदस्य प्रल्हाद मिस्त्री.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका विवाहित महिलेने सासरच्या त्रासाला कंटाळून पुणे येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांकडे मदत मागितली. 4-5 मुलींनी तिला त्या मुलीचा जीव वाचावा म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली. आपत्कालीन परिस्थिती असल्यामुळे त्यातील 2 मुलींनी सदर पीडित मुलीला आपल्या आपल्या खोलीवर एका रात्रीसाठी ठेवून घेतले व दुसऱ्या दिवशी सकाळी ती पीडित मुलगी निघून गेली. याबद्दल निवृत्त पोलीस उपनिरीक्षक असणाऱ्या त्या पीडित मुलीच्या सासर्यांनी या तीन मुलींच्या घरी व कामाच्या ठिकाणी पोलिस पाठवून त्या मुलींना धमकावले. या मुलींना बेकायदेशीरपणे पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्यांना मारहाण करण्यात आली. तसेच जातीयवाचक शिवीगाळ करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणात मूळ पीडित मुलगी असणाऱ्या मुलीचा सासरी होणारा छळ, तिला मदत करणाऱ्या मुलींचा होणारा शारीरिक, मानसिक छळ आणि जातीवाचक शिवीगाळ या संपूर्ण गोष्टी अतिशय गंभीर आहेत. असे महाराष्ट्र अंनिसच्या वतीने मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना मा. निवासी उपजिल्हाधिकारी या.रोहितकुमार राजपूत नाशिक यांच्या मार्फत पाठवलेल्या निवेदनात म्हटलेले आहे .निवेदनात पुढे म्हटले आहे की, या प्रकरणात पुण्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करून एफ आय आर दाखल करून घेण्याची विनंती केली. परंतु पोलिसांनी अतिशय बेजबाबदारपणे या मागणीकडे दुर्लक्ष केले. गेले तीन दिवस अशी एफ आय आर नोंदवून घेतलेली नाही. उलट अतिशय बेजबाबदारीची उत्तरे दिलेली आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या कार्यकर्त्यांना तब्बल चौथ्या दिवशी अप्पर पोलीस आयुक्त यांनी पोलिस निरीक्षकांकडून अशा प्रकारचा ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करता येणार नाही, असे लेखी दिले आहे. पोलीस अधिकाऱ्यांची ही कृती अतिशय गंभीर आणि पोलीस यंत्रणेच्या संवेदनशीलतेविषयी शंका निर्माण करणारी आहे.या प्रकरणातील सर्व पिडीत मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना म्हणून आम्ही पुढील मागण्या करीत आहोत -1. या संपूर्ण प्रकरणात पीडित व्यक्ती असलेल्या मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून आपण तात्काळ हस्तक्षेप करावा आणि या मुलींना न्याय मिळवून द्यावा.2. या मुलींना अयोग्य वागणूक देणाऱ्या आणि जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९ व भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हे दाखल करावेत. 3. सदर सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी करून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी. 4. सासरच्या छळाने आश्रयासाठी बाहेरून आलेल्या मूळ पीडित मुलीला संरक्षण व सुरक्षितेची खात्री द्यावी.आमच्या या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्यास आम्हाला संविधानिक मार्गाने राज्यव्यापी जनआंदोलन करावे लागेल. असेही निवेदनात नमूद केलेले आहे. निवेदनावर महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान डॉ. ठकसेन गोराणे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. आशा लांडगे, राज्य सदस्य प्रल्हाद मिस्त्री, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.[04/08, 17:42] डॉ. गोराणे अंधश्रद्धा निर्मूलन समिती सरचिटणीस: पुणे येथील पिडीत महिला, मुलींना न्याय मिळावा म्हणून मा.मुख्यमंत्री यांना मा.निवासी उपजिल्हा अधिकारी रोहितकुमार राजपूत यांच्या मार्फत निवेदन देताना महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. आशा लांडगे, राज्य सदस्य प्रल्हाद मिस्त्री..


