
भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील पाचवा कसोटी सामना (Test Match) रंगतदार वळणावर आला होता. या सामन्यात अखेर भारताने ६ धावांनी विजय मिळविला आहे. त्यामुळे पाच कसोटी सामन्यांची मालिका २-२ ने बरोबरीत सुटली आहे.इंग्लंडसमोर ३७४ धावांचे विशाल लक्ष्य होते. पण हॅरी ब्रूक आणि जो रूट या दोघांनी मिळून इंग्लंडच्या विजयाच्या आशा प्रबळ केल्या.

दोघांनीही शतके ठोकून सामना भारताच्या हातातून निसटतो की काय, असा क्षण आला होता. मात्र भारताच्या वेगवान माऱ्यासमोर इंग्लंड संघाने गुडघे टेकले. प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज या जोडीने शेवटच्या सत्रात माऱ्याची धार वाढवत इंग्लंडचा डाव २६७ धावांत गुंडाळला. या विजयाने भारताने केवळ सामना नव्हे, तर मालिका देखील वाचवली.

