
सरताळे (प्रतिनिधी)-आश्रम शाळा सरताळे येथे अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी*आश्रमशाळा सरताळे येथे संस्था कोषाध्यक्षा तथा प्राथ. आश्रमशाळा मुख्याध्यापिका नम्रता शेवाळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात जेष्ठ सेवानिवृत्त शिक्षक व्ही. एम. दराडे यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करून करण्यात आली. नंतर आश्रम शाळा विद्यार्थ्यांची भाषणे झाली. सदर प्रसंगी कार्यक्रम अध्यक्ष प्राचार्य समाधान चौधरी यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठेंच्या जीवन कार्याबद्दल माहिती देतांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या समृद्ध व समाजाच्या सत्य परिस्थितीची यथार्थ मांडणी करणाऱ्या साहित्याची स्तुती करत विकसित राष्ट्राच्या पाया भरणी साठी व विश्व कल्यानार्थ सामाजिक समता व सलोख्याचं महत्व विषद केलं.सदर कार्यक्रमास मुख्याध्यापिका नम्रता पगार, जेष्ठ शिक्षक दराडे सर, भगवान हिरे व कैलास पगार सर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगताप सर यांनी मांडले तर सुत्रसंचालन अशोक पाटील यांनी केले.सोळुंके सरांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रम समारोप करण्यात आला.
