
न्यायडोंगरी (प्रतिनिधी) लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी दि. 1 ऑगस्ट 2025 रोजी स्व. अण्णासाहेब गंगाधर शिवराम आहेर प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा, न्यायडोंगरी ता. नांदगाव, येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती अत्यंत उत्साहात व सन्मानपूर्वक साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. संस्थेचे खजिनदार मा. दर्शनभाऊ आहेर यांच्या उपस्थितीत शिक्षक व विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरले ते इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्याचे लोकमान्य टिळक यांच्या वेशभूषेतील सादरीकरण, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये टिळकांच्या विचारांची प्रेरणा जागवण्यात मदत झाली.इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंतच्या ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी भाषणे, कविता व नाट्यछटांच्या माध्यमातून टिळक व साठे यांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकला ,भाषण स्पर्धा दोन गटांत विभागली होती – लहान गट (१ ली ते ७ वी) व मोठा गट (८ वी ते १२ वी).पारितोषिके खालीलप्रमाणे देण्यात आली:प्रथम क्रमांक: ₹५०० द्वितीय क्रमांक: ₹२०० तृतीय क्रमांक: ₹१०० तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.मुख्याध्यापकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत लोकमान्य टिळकांसारखी निर्भयता, देशप्रेम व कर्तव्यनिष्ठा अंगीकारण्याचा संदेश दिला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
