
-**सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९८५ वा दिवस* स्वतःचा व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करणे ही तुमची प्राथमिकता असली पाहिजे. तुमचे जीवन सुंदर, समृद्ध, सफल व सार्थक व्हावे. मानवतावादी विचारांसाठी तुम्ही सतत प्रयत्न करावा ही तुमची अतःप्रेरणा असावी. आज या घटकेपासून तुम्ही निर्धार करा, स्वतःला कमकुवत विचारांपासून सतत दूर ठेवाल आणि मनात समृध्द व सकारात्मक विचार सतत तेवत ठेवाल. यामुळे तुम्हाला सुख, शांती, समृद्धि मिळेल, पर्यायाने, तुमची इच्छित फलप्राप्ती होईल. कितीतरी लोक धनाने श्रीमंत असतात; पण विचाराने दरिद्री असतात. *स्वामी विवेकानंद…
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर ११ श्रावण शके १९४७
★ श्रावण शुध्द /शुक्ल ९
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. २ ऑगस्ट २०२५ ★ १७८१ पेशवाईतील मुत्सद्दी, साडेतीन शहाण्यापैकी एक पूर्ण शहाणा सखारामबापू बोकील यांचा स्मृतिदिन.
★ १८७६ भारताचा राष्ट्रध्वज “तिरंगा” ध्वजाचे रचनाकार पिंगाली वेंकय्या यांचा जन्मदिन.
