
नांदगाव -(प्रतिनिधी )भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे या थोर व्यक्तिमत्त्वांचा आदर्श नवीन पिढीने घ्यावा असे मत नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी व्यक्त केले ते शतकोत्तर परंपरा असणाऱ्या लोकमान्य वाचनालय तर्फे आयोजित लोकमान्य टिळकांच्या जीवन चरित्रावरील वकृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष रमणलाल छाजेड हे होते प्रमुख अतिथी म्हणून स्टेट बँकेचे व्यवस्थापक वीरेंद्र विक्रम, संस्थेचे चिटणीस प्रभाकर काकळीज हे मान्यवर मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक दत्तराज छाजेड यांनी केले तर सूत्रसंचालन प्रसाद बुरुकुल यांनी केले सदर स्पर्धेत नांदगाव शहरातील सर्व शाळांनी सहभाग नोंदवला सुमारे 350 हून अधिक विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी, उर्दू आदी भाषातून लोकमान्य टिळकांवर आपले विचार व्यक्त केले आभार प्रदर्शन व्यवस्थापक भिकाजी पाठक, यांनी केले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली याप्रसंगी शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
