
मखमलाबाद विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करतांना प्राचार्य संजय डेर्ले,सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी.
मखमलाबाद { वार्ताहर } = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्राचार्य संजय डेर्ले यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.कु.श्रद्धा गांगुर्डे,कु.अक्षया आव्हाड व कु.कार्तिक कालेकर याने टिळकांची वेशभूषा करून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवन कार्याविषयी सखोल माहिती दिली.लोकमान्य टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरीतील चिखली या गावी झाला.त्यांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक असे होते.त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधरपंत तर आईचे नाव पार्वतीबाई होते.कु.वृंदा गावित,कु.श्रद्धा बुलबुले,कु.रोशनी साबळे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याविषयी सखोल माहिती दिली.योगिता कासार यांनी आपल्या मनोगतात लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी लोकांसाठी लोककल्याणासाठी कामे केली म्हणून त्यांना “लोकमान्य” ही पदवी मिळाली.लोकसेवेसाठी त्यांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूल,डेक्कन एज्युकेशन सोसायटी व फर्ग्युसन कॉलेज या शिक्षण संस्था सुरू केल्या.सन १८८१ मध्ये त्यांनी केसरी व मराठा वृत्तपत्राची निर्मिती केली त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून इंग्रजांविरुद्ध जळजळीत लेखन केले.सर्व समाजाला एकजूट करण्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केले.सामान्य जनतेला राष्ट्रीय दृष्ट्या जागृत करून परकीय सत्तेच्या विरोधात उभे करण्याचे अत्यंत कठीण कार्य त्यांनी केले म्हणूनच “भारतीय असंतोषाचे जनक” ही उपाधी त्यांना मिळाली.तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लिखाणातून अतिशय चांगले कार्य केले आहे.त्यांनी दीनदलितांसाठी आपले पूर्ण जीवन सार्थकी लावले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. श्रावणी डगळे व कु.आकांक्षा कोलते यांनी केले.कु.आर्यन पांगारकर व कु.पार्थ अहिरे यांनी आभार प्रदर्शन केले.इयत्ता सहावी व दहावीच्या या सर्व विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षिका योगिता रोडे व मनीषा कारे यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
