
मनमाड -(प्रतिनिधी ) येथील मविप्र संस्था संचलित आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रियंका धात्रक होत्या .कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्ययांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिक्षिका सुप्रिया शिंदे यांनी लोकमान्य लोकमान्य टिळका बाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली

यावेळी उपशिक्षिका श्रीमती आहेर एस आर यांनी देखील अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांनी आपआपल्या भाषणातून लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याची माहिती दिली.त्याचबरोबर श्लोक स्पर्धा आयोजित करण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अनुज गुप्ता या विद्यार्थ्यांने केले कार्यक्रमासाठी शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
