
पिंपरखेड -(प्रतिनिधी )आज रोजी विद्यालयात साहित्यसम्राट, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. काशिनाथ गवळी यांच्या हस्ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रसंगी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थ्यांनी देखील प्रतिमा पूजन करून अभिवादन केले. यावेळी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक संजय कांदळकर यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवनावर व उत्तम सोनवणे यांनी साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर भाष्य करून विद्यार्थ्यांना त्यांच्या कर्तृत्वाची ओळख करून दिली. तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देखील आपापले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक संजय कांदळकर, कैलास पठाडे, लक्ष्मण जाधव, उत्तम सोनवणे, संदीपभाऊ मवाळ, आबासाहेब सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले. सुत्रसंचालन संजय कांदळकर यांनी तर आभार कैलास पठाडे यांनी मानले.
