
सिन्नर (प्रतिनिधी):- डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती संयुक्तपणे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक रंगनाथ उगले होते. व्यासपीठावर पर्यवेक्षक उल्हास पवार ज्येष्ठ शिक्षक पी.आर.करपे , सोमनाथ गिरी, सोमनाथ पगार,कचेश्वर शिंदे,रामदास वारुंगसे आदी उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते टिळक व साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले होते .टिळक व साठे यांच्या जीवन व कार्याचा परिचय अनन्या कडभाने, अनुष्का माळी, प्रिया वाजे व आराध्या वाजे या विद्यार्थ्यांनी करून दिला.इयत्ता आठवी तु- ब चे वर्गशिक्षक सोमनाथ गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन केले. यावेळी बोलतांना कार्यक्रमाचे अध्यक्ष उगले म्हणाले की,टिळक यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम घेतले. आपल्या वृत्तपत्रातून इंग्रज सरकारविरुद्ध जनजागृती केली. म्हणून त्यांना असंतोषाचे जनक म्हणतात.तसेच अण्णाभाऊ साठे हे थोर समाजसुधारक होते.आपल्या साहित्यातून त्यांनी दलित, कष्टकरी व कामगारांचे प्रश्न मांडले.टिळक व साठे यांचे कार्य उल्लेखनीय आहे. सूत्रसंचालन मानसी वारुंगसे व धनश्री माळी यांनी केले तर अनुश्री कुंदे आभार व्यक्त केले .यावेळी कार्यक्रमास विद्यालयातील सुनिल ससाणे, शिवाजी गुरुळे,वरिष्ठ लिपिक राणी शिंदे आदींसह शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
