
रोहिले (प्रतिनिधी ) दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने विद्यालयात एक विशेष वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी दोन्ही थोर व्यक्तींच्या कार्यावर भाषणे दिली. “शिकून उठा, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या अण्णाभाऊ साठे यांच्या मंत्रावर विद्यार्थ्यांनी ओघवत्या भाषेत विचार मांडले. तर “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे” या टिळकांच्या घोषणेमागचा ऐतिहासिक संदर्भ काही वक्त्यांनी अभ्यासपूर्वक मांडला.या स्पर्धेत विद्यालयातील 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी आपल्या वकृत्वातून सामाजिक समता, शिक्षण, क्रांती, आणि देशभक्तीचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ जे. एस. जाधव होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सोनवणे बी एस हे होते प्रमुख वक्ते म्हणून श्री पाडवी बी यू. तसेच सोनवणे बी एस मुख्याध्यापिका जाधव मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केलेकार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वृंद, सांस्कृतिक समिती व विद्यार्थी प्रतिनिधींचे विशेष योगदान लाभले.हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये भाषाशैली, आत्मविश्वास व देशभक्तीची भावना वृद्धिंगत करणारा ठरला. कार्यक्रमाच सुंदर असे संचलन विद्यालयातील विद्यार्थिनी कु मयुरी सुनील अरबूज हिने केले तर आभार प्रदर्शन सय्यद एस एन यांनी केले
