
साकोरे (प्रतिनिधी ) पेङकाई माता सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या माध्यमिक विद्यालय साकोरे ता नांदगाव येथे आज लोकमान्य टिळक पुण्यतिथी व आण्णासाहेब जयंती निमित्तानं कार्यक्रमा चे प्रमुख पाहुणे म्हणून फ्लाँयर अँकेङमी चे संस्थापक हे होते .निकम यांनी बोलताना लोकमान्य टिळक व आण्णाभाऊ साठे सदैव समाजाचा आरसा म्हणून लेखनी मधून व पोवाड्या मधून मांङल्या ते कायम समाजासाठी व देशासाठी लढत राहिले तसेच शिक्षण हे निरंतर प्रक्रिया आहे आपण स्पर्धा परीक्षेत सहभागी व्हावे वाचन करण्याचा सल्ला दिला. यावेळी कार्यक्रमा चे अध्यक्ष म्हणून योगेश पाटील होते कार्यक्रमा चे आयोजन इयत्ता ९ वी च्या वर्गाने केले. सुञसंचलन मानवी बोरसे व चंचल बोरसे हिने केले तर आभार वर्गशिक्षक भाबङ सर यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे निकम यांनी विद्यार्थी हितासाठी ङिजीटल शिक्षणासाठी आवश्यक ते साहित्य देण्याचे घोषित केले. यावेळी शिक्षक , शिक्षकेत्तर , विद्यार्थी उपस्थित होते. आयोजकांन कङून निकम यांचा विशेष असा सन्मान केला व आभार व्यक्त केले
